कऱ्हाडच्या या नेत्यांचे कृष्णा नदीत एकत्रित बोटींग

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी एकत्रित केलेल्या बोटींगची चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगली आहे. बोटींग केल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच हास्य उमटले होते.
Karads Political leaders Boating  Krishna River
Karads Political leaders Boating Krishna River

कऱ्हाड : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आणि विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी काल कऱ्हाडातील कृष्णा नदीत एकत्रित बोटींगचा आनंद लुटला. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कऱ्हाडमधील लोकांना मदत व्हावी, म्हणून क्रेडाई या संस्थेने बोट दिली आहे. या बोटीच्या लोकार्पणानिमित्त कऱ्हाडच्या नेत्यांनी एकत्रित बोटींग केले. 

कऱ्हाडमधील कृष्णा नदीत क्रेडाईने आणलेल्या बोटीचा लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पालिकेचे विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील उपस्थित होते.

 काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी एकत्रित केलेल्या बोटींगची चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगली आहे. बोटींग केल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच हास्य उमटले होते. कऱ्हाड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील राष्ट्रवादीचे नेते आहेत.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज काँग्रेसचे नेते आहेत. भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून रोहिणी शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. कऱ्हाड पालिकेचे विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील उपस्थित होते. राजकीय वर्तूळात सगळ्याच नेत्यांच्या भुमिका वेगवेगळ्या असतात. ते एकाच बोटीत कधी बसतील अशी शक्यता कमीच असते. काल तो योगायोग कऱ्हाडात आला.  क्रेडाईतर्फे बोटीचा लोकार्पण सोहळा झाला. त्या बोटीत पालिकेचे विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील, क्रेडाईचे अध्यक्ष धनंजय कदम हेही बसले होते.

कऱ्हाडातील दिग्गज नेत्यांचे एकत्रित बोटींग प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, पालिकेचे उपाध्यक्ष जयवंत पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक हणमंत पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष आप्पा माने यांना पाहायला मिळाली. वास्तविक कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने पार पडला. मात्र नेत्यांच्या एकत्रित बोटींगने तो सोशल मिडियावर चांगलाच गाजला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com