पृथ्वीराज चव्हाणांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्याला मिळाले बक्षिस 

महाराष्ट्रासह सिक्कीम, नागालॅण्ड, अरुणाचलप्रदेश, पश्चिमबंगाल आदी राज्यात त्यांनी पक्ष संघटनेचे काम केले. काँग्रेसचे संघटन वाढवताना श्री. मोरे यांनी घेतलेली मेहनत पक्षाने हेरली. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघासोबतच त्यांना पक्षाने २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचीही जबाबदारी दिली होती.
Prithviraj Chavan and Shivraj More
Prithviraj Chavan and Shivraj More

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या प्रचाराचे तंत्रशुद्ध नियोजन करून यांच्या विजयात सिंहाचा वाटा असलेले त्यांचे व समर्थक युवा नेते शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 

युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक दिल्ली येथे झाली. त्यामध्ये त्यांची निवड करण्यात आली. बैठकीला युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. श्रीनिवास, प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिवराज मोरे हे यापूर्वी युवकचे सरचिटणीस होते. त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार (स्व.) ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांना राजकीय आदर्श मानून मोरे यांनी विद्यार्थी दशेपासून काँग्रेसच्या माध्यमातून कार्याला सुरुवात केली. श्री. मोरे यांना युवकच्या माध्यमातून अल्पावधीत देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली. अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून काम करताना त्यांनी विद्यार्थी काँग्रेस सोबत देशभरातील युवकांना सहभागी केले. 

महाराष्ट्रासह सिक्कीम, नागालॅण्ड, अरुणाचलप्रदेश, पश्चिमबंगाल आदी राज्यात त्यांनी पक्ष संघटनेचे काम केले. काँग्रेसचे संघटन वाढवताना श्री. मोरे यांनी घेतलेली मेहनत पक्षाने हेरली. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघासोबतच त्यांना पक्षाने २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचीही जबाबदारी दिली होती. तेथील सुमारे १२ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसने श्री. मोरे यांच्यावर सोपवली होती. 

श्री. मोरे यांनी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या प्रचाराचे तंत्रशुद्ध नियोजन केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विजयात श्री. मोरे यांचा वाटा सिंहाचा आहे. पक्षासाठी युवकांचे केलेले संघटन व पक्षनिष्ठा लक्षात घेवून त्यांची पक्षाच्या युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली गेली आहे.

पक्षाचे संघटन व त्यामध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर शिवराज मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीला साजेसे काम करून पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com