सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष (कै.) शिवाजीराव देसाई यांची ३४ वी पुण्यतिथी कोरोनाच्या संकटामुळे साध्या पध्दतीने साजरी केली जाणार आहे. या निमित्त १२ जुलैला सकाळी साडे दहा वाजता दौलतनगर (मरळी) ग्रामपंचायतीच्या हद्दीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पाच हजार वृक्ष लागवडीचा प्रारंभ होणार आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले की, दौलतनगर (ता.पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष (कै.) शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी (कै.) शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३४ वा पुण्यतिथी कार्यक्रम रविवार (ता.१२) सकाळी साडे दहा वाजता दौलतनगर येथे आयोजित केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम अत्यंत साध्या पध्दतीने होणार आहे. पुण्यतिथीनिमित्त गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावरील (कै.) शिवाजीराव देसाई यांच्या पुतळयास व समाधीस पुष्पचक्र अर्पण करतील. तसेच शताब्दी स्मारकातील (कै.) आबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणार आहेत.
तसेच (कै.) शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने दौलतनगर (मरळी) ग्रामपंचायतीच्या हद्दीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सुमारे पाच हजार वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. दोन ते तीन दिवसांत या परिसरात ५००० वृक्षांच्या लागवडीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.