कोरोना इफेक्ट : सातारकरांनी ओढावून घेतले पुन्हा लॉकडाउन

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये लॉकडाउन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
Satara Lockdown
Satara Lockdown

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जिल्ह्यात गुरूवारी (ता. 16) मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता बाजारपेठेसह सर्व काही बंद राहणार आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या या लॉकडाउनमध्ये 17 ते 22 जुलै कडक लॉकडाउन असेल. त्यानंतर 23 ते 26 जुलैदरम्यान लॉकडाउनमध्ये शिथीलता देऊन सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत दुकाने सुरू राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला असला तरी सातारकरांनी पुन्हा लॉकडाउन ओढावून घेतल्याचे चित्र आहे. 
 
सातारा जिल्ह्यात जुलैच्या सुरवातीपासून कोरोना बाधित रूग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज 50 ते 70 बाधित सापडण्याची सरासरी कायम राहिली आहे. लोकांनी विनाकारण गर्दी करण्यास सुरवात केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुरवातीला दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाचवरून सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत कमी केली.

तरीही गर्दी कमी होण्याऐवजी वाढली. त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये लॉकडाउन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

 
जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन सुरू होणार असून 22 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत त्याची कडक अंमलबजावणी होईल. त्यानंतर ता. 23 ते 26 जुलैपर्यंत लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार असून सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सर्व दुकाने व खासगी अस्थापना सुरू राहतील. 

हे बंद राहणार... 
- किराणा दुकाने, किरकोळ, ठोक विक्रेते व व्यवसाय (ता. 17 ते 22 जुले) 
- उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल 
- वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकाने 
- खाद्यपदार्थांची ऑनलाइन घरपोच सेवा 
- सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जाग, उद्याने, वॉक 
- केश कर्तनालय, सलून, ब्युटी पार्लर 
- सर्व प्रकारचे विक्रेते, आठवडा बाजार, दैनंदिन बाजार, फेरीवाले 
- मटन, चिकण, अंडी, मासे 
- शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग 
- सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने, दोन चाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने 
- बांधकाम व कन्स्ट्रक्‍शनची कामे 
- चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृहे, करमणूक केंद्र, प्रेक्षागृह 
- मंगल कार्यालये, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ 
- सर्व प्रकारची खासगी कार्यालये 
- सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम 
- धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे 
- ई कॉमर्स सेवा 

निर्बंधात हे सुरू राहणार... 
- दूध विक्री, घरपेच दूध वितरण (सकाळी सहा ते दहा) 
- सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा 
- सर्व रूग्णालये व निगडीत सेवा 
- मेडिकल दुकाने (सकाळी नऊ ते दोन) 
- हॉस्पिटलशी संलग्न औषध दुकाने (24 तास) 
- न्यायालये, शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये 
- पेट्रोल पंप व गॅस पंप (सकाळी नऊ ते सायंकाळी सहा) (अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांसाठी) 
- घरपोच गॅस वितरण, रेशन दुकाने 
- निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक 
- औद्योगिक व अत्यावश्‍यक वस्तू पुरवठा करणारी वाहने 
- पाणीपुरवठा करणारे टॅंकर 
- सर्व बॅंका, सोसायटी, एलआयसी कार्यालये (सकाळी नऊ ते दोन) 
- एमआयडीसीतील व खासगी उद्योग 
- शेती व दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन कामे 
- कृषी सेवा, बी- बियाणे, खते, किटकनाशके, चारा दुकाने (सकाळी नऊ ते दोन) 

जिल्ह्यात वर्तमानपत्र सुरूच 
सातारा जिल्ह्यात वर्तमानपत्र आणि त्याचे वितरण सुरू राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वांना सकाळी सहा ते नऊ या वेळेत घरपोच वर्तमानपत्र मिळणार आहे. परंतु, विक्रेत्यांनी स्वत:सह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वर्तमानपत्र हाताळणीतून कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com