खंबाटकी घाटात लुटणारी टोळी जेरबंद, सहा गुन्हे उघडकीस

या आरोपींनी जबरी चोरीसह सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.त्यांच्याकडून चोरीस गेलेले मोटरसायकल, दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख 59 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. यातील एक आरोपी अद्याप फरारी असून त्याचा शोध सुरू आहे.
Robbery Gang arrested In Khambatki Ghat
Robbery Gang arrested In Khambatki Ghat

खंडाळा (जि. सातारा) : खंबाटकी घाट परिसरात प्रेमी युगुलांना लुटणारी व गेले सहा महिने महिने पोलिसांना चकवा देणारी जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात खंडाळा पोलिसांना यश आले आहे. या टोळीने जबरी चोरीच्या सहा गुन्ह्याची कबुली दिली आहे. या टोळीतील तिघांना सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एकुण एक लाख 59 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ जानेवारीला राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सातारा बाजुकडे जाताना भैरवनाथ मंदिराजवळील पायी रस्त्यावर फिर्यादी व त्यांची मैत्रीण थांबले होते.

यावेळी दोन अज्ञात व्यक्ती व आणखी दोन साथीदाराने मैत्रिणीच्या गळ्याला चाकू लावून तर दुसऱ्या चोरट्याने फिर्यादींला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाईल फोन, सोन्याची अंगठी, रोख रक्कम व मोटर सायकल जबरदस्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी यातील फिर्यादीने खंडाळा पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

याचा तपास खंडाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड करीत होते. या गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पोलिस नाईक सचिन वीर, प्रशांत धुमाळ, बालाजी वडगावे व सुरेश मोरे यांनी मोबाईल फोनशी संबंधित माहिती संकलित केली. तसेच या परिसरातून त्या दिवशी झालेल्या फोन कॉल्सची माहिती तांत्रिक बाबींच्या आधारे घेतली. त्यावेळी काही संशयित मोबाईल क्रमांक आढळून आले. त्याचा सखोल तपास केला.

त्यामध्ये संजय जाधव यांनी ही चोरी केल्याचा संशय निर्माण झाला. तेव्हापासून या संशयित आरोपीच्या मागावर पोलिस होते. दरम्यान, रविवारी पाच जुलै रोजी संशयित दादा उर्फ संजय जाधव हे येथील खंबाटकी घाट मार्गे जाणार असल्याची माहिती खबऱ्याकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या पथकाला मिळाली. त्याप्रमाणे खंडाळा येथील जुन्या टोलनाक्यावर सापळा लावून दादा जाधव यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांने त्याचे साथीदार पप्पू सर्जेराव जाधव ( रा. रामोशी वस्ती, मुळीकवाडी, ता. फलटण), तुषार बाळासो पाटोळे (रा. तरडगांव, ता. फलटण), अजित महादेव बोडरे (रा. तांबवे, ता. फलटण) यांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी जबरी चोरीसह सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून चोरीस गेलेले मोटरसायकल, दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख 59 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. यातील एक आरोपी अद्याप फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक हनुमंत गायकवाड करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com