संजीवराजेंच्या आमदरकीसाठी रामराजेंचे पवारांना साकडे 

संजीवराजे हे रामराजेंचे चुलत बंधू आहेत. तसेच ते मागील वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. आता त्यांना विधान परिषदेवर पाठवून आमदार करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Ramraje Naik Nimbalkar and Sharad Pawar
Ramraje Naik Nimbalkar and Sharad Pawar

सातारा : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची वर्णी लावावा, यासाठी मागणी फलटण तालुक्‍यातून जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज साताऱ्यातील विश्रामगृहात खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी श्री. रामराजे यांच्यासमवेत संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर ही उपस्थित होते. प्रथमच या तिघ बंधूंनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादीतील काहींच्या भुवया उंचावल्या आहेत. 

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागा रिक्त आहेत. या जागांवर आपल्याच पक्षातील कोणाची तरी वर्णी लागावी, यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता प्रयत्न करत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेत्याची वर्णी लावण्यासाठी धडपडत आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत त्यांच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर साताऱ्यातून फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 फलटण तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून याबाबत पत्रकबाजीही सुरू आहे. संजीवराजे हे रामराजेंचे चुलत बंधू आहेत. तसेच ते मागील वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. आता त्यांना विधान परिषदेवर पाठवून आमदार करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात खासदार शरद पवार यांची विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर ही उपस्थित होते.

आजपर्यंत रामराजेंसोबत त्यांचे तीनही चुलत बंधू एकाचवेळी कधीही श्री. पवार यांना भेटले नव्हते. आज प्रथमच ते तिघेही श्री. पवार यांना भेटले. त्यामुळे राष्ट्रवादीतील काहींच्या भुवया उंचावल्या गेल्या. दरम्यान, श्री. पवार यांच्यासमवेत या तिघांची कमराबंद चर्चा झाली. यामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. आता राजू शेट्टीनंतर संजीवराजेंना विधान परिषदेवर घेऊन सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार वाढविला जाणार का, असा प्रश्‍न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com