कृष्णाकाठचा हा गुण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी घ्यावा : सतेज पाटील

सातारा जिल्ह्यात शासकिय मेडिकल कॉलेज व्हावे, हे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वप्न होते, असे सांगून सतेज पाटील म्हणाले, आज ते स्वप्न साकार होताना दिसत आहे. या मेडिकल कॉलेजचा पाया पृथ्वीराज बाबांनी घातला आहे.
Minister of State for Home Satej Patil
Minister of State for Home Satej Patil

मलकापूर (ता. कऱ्हाड) : एक पाऊल मागे पुढे सरकून पुढे जायचे आहे. ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांची सध्या प्रकृती ठीक नसल्याने पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या भेटीला गेले होते. त्यांची विचारपूस केली हा कृष्णाकाठचा गुणधर्म आहे. तोच आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे. या एकीमुळेच जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचे काम निश्चित होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला.

मलकापूर परिसरातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज आले होते. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.  ते म्हणाले, जिल्ह्यातील जुन्या लोकांच्या कामांची नोंद इतिहासात होत राहते. एका विचाराने कामे करून जिल्ह्याच्या विकासाला गती दिली पाहिजे.

तरुणपिढीने जुन्या नेत्यांच्या विकासाच्या दृष्टीचा व विचारांचा आदर्श घेतला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील- उंडाळकर व श्रीनिवास पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद आम्हा तरुणांना लाभल्यास आम्ही जनतेच्या सेवेत आणि परिसराच्या विकासात कोठेही कमी पडणार नाही. 

सातारा जिल्ह्यात शासकिय मेडिकल कॉलेज व्हावे, हे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वप्न होते, असे सांगून सतेज पाटील म्हणाले, आज ते स्वप्न साकार होताना दिसत आहे. या मेडिकल कॉलेजचा पाया पृथ्वीराज बाबांनी घातला आहे.

परवाच उपमुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात बैठक झाली. त्यांनीही हा प्रश्न तडीस नेण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. आगामी कालावधीत हे कॉलेज लवकरच उभे राहिल. त्यासाठी शासनदरबारी आमचे प्रयत्न सुरू राहतील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com