कोरोनात जनतेवर बोजा नको; पाणी, घरपट्टी माफ करा : उदयनराजे भोसले

ज्यावेळी दैनंदिन गरजा भागविण्यास सातारकर नागरीक धडपत आहेत. त्यावेळी त्यांच्यावर घरपट्टी व पाणीट्टीचा बोजा न टाकता, नागरीकांच्या जगण्याला माणुसकीच्या भावनेतुन शासनाने बळ दिले पाहिजे, अशी आमची मनापासूनची मागणी आहे.
MP Udyanraje Bhosale
MP Udyanraje Bhosale

सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बिकट आणि प्रतिकुल परिस्थितीचा सामना सातारकर करत आहेत. अशा जटिल परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचातींमधील नागरीकांच्या मिळकतींची २०२०-२१ या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम माफ करावी. याबाबत शासनाने निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून नागरीकांच्या हिताचा निर्णय घेण्याची शिफारस राज्य शासनास करावी, अशी सूचना भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.  

उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले की, कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देशांचे कंबरडे मोडले असतानाही सामान्य माणुस जगला पाहिजे म्हणून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

राज्य शासन देखील कषी विषयक तसेच वीजबिलाबाबत नागरीकांना सवलत देण्यासह अनेक उपाय योजना करत आहे. त्याच धर्तीवर सातारा जिल्हयातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हददीतील मिळकतधारकांची २०२०-२१ या वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याबाबतचा निर्णय घ्यावा व नागरीकांना दिलासा दयावा, अशी आमची ठाम भुमिका आहे.

ज्यावेळी दैनंदिन गरजा भागविण्यास सातारकर नागरीक धडपत आहेत. त्यावेळी त्यांच्यावर घरपट्टी व पाणीट्टीचा बोजा न टाकता, नागरीकांच्या जगण्याला माणुसकीच्या भावनेतुन शासनाने बळ दिले पाहिजे, अशी आमची मनापासूनची मागणी आहे.

आम्ही स्वतः तसेच जिल्हयातील आमचे सर्व सहकारी-पदाधिकारी हे जिल्हयातील सातारकर नागरीकांच्या सुख दुखा:त कायमच सहभागी राहिले आहेत. कै.प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज पूर्वीपासून सातारकर जनता आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे, असे आम्ही आजपर्यंत समजत आलो आहोत. सातारकर नागरीक आणि आमचे एक अतुट असे नाते आहे, असेही उदयनराजेंनी शेवटी नमुद केले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com