कोरेगावातील गांजा तस्करीचे मूळ माळशिरस तालुक्यात; मुख्य सूत्रधारास अटक

तपासादरम्यान दहिवडीतील दोघांनी काळमळ (पिलीव, ता. माळशिरस) येथील लक्ष्मण रामू जाधव यांच्याकडून गांजा खरेदी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर बुधवारी रात्री सहायक पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या पथकाने काळमळ (पिलीव) येथे छापा टाकून जाधव याला ताब्यात घेतले.
The original cannabis smuggling in Koregaon is in Malshiras taluka; Chief facilitator arrested
The original cannabis smuggling in Koregaon is in Malshiras taluka; Chief facilitator arrested

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात गांजा तस्करीचे रॅकेट सहायक पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी उघडकीस आणल्यानंतर आता या रॅकेटचा मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार करत गांजा ज्या ठिकाणाहून सप्लाय केला जातो. त्या ठिकाणी म्हणजेच काळमळ (पिलीव, ता. माळशिरस) येथे बुधवारी रात्री धडक कारवाई करत मुख्य सुत्रधाराला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून दोन लाख ९५ हजार ४१० रुपये किंमतीचा ४९ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सुत्रधाराला कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 शुक्रवारी (ता. १३) सायंकाळच्या सुमारास सातारा-लातूर महामार्गावर चिमणगांव गोठ्यानजीक होंडा ॲक्टिव्हा स्कुटरवरुन गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक रितू खोखर यांना खबर्‍यांमार्फत मिळाली होती.

त्यांनी विशेष पथक तयार करुन होंडा ऍक्टिव्हा स्कुटर (क्र. एम. एच. ११-बी. वाय.-३०९१) वरुन चाललेल्या हसीम नजीर झारी व सचिन तुकाराम मदने (दोघे रा. पुसेगाव) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चार किलो १८५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. त्यांच्याकडील मोबाईल हँडसेटसह एकूण ७७ हजार ८३० रुपयांचा ऐवज जप्त केला होता. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी दहिवडीतील बाजारपटांगणाजवळ राहत असलेल्या सुनील किसन जाधव व प्रकाश अशोक जाधव यांच्याकडून गांजा खरेदी करत असल्याची कबुली दिली.

रितू खोखर यांच्या पथकाने त्याच रात्री दहिवडीत धडक कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्या घराच्या तपासणीत ६३ हजार ५७० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. त्यांच्या विरुध्द कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधितांना पोलिस कोठडी मिळाली होती. तपासादरम्यान दहिवडीतील दोघांनी काळमळ (पिलीव, ता. माळशिरस) येथील लक्ष्मण रामू जाधव यांच्याकडून गांजा खरेदी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर बुधवारी रात्री सहायक पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या पथकाने काळमळ (पिलीव) येथे छापा टाकून जाधव याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून दोन लाख ९५ हजार ४१० रुपये किंमतीचा ४९ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे, हवालदार विजय जाधव, पोलीस नाईक धनंजय दळवी, अमोल सपकाळ, किशोर भोसले, साहिल झारी, इंद्रजित भोसले, अजय गुरव, तुषार बाबर, निलेश जांभळे, शंकर पांचागणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com