सासूच्या चितेला सुनेने दिला मुखाग्नी

नातेवाईकांनी ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातून दहिसर गावात अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याचेकळवले.
Corona News Thane District
Corona News Thane District

मनोर : कोरोना प्रादुर्भावामुळे आपल्या नातेवाईकांचे अंतिम दर्शन आणि त्यांचा दाहसंस्कार करण्यास देखील उपस्थित राहता येत नाही, अशी वेळ आली आहे. अशाच एका प्रसंगात सासूच्या चितेला नातेवाईक उपस्थित राहू न शकल्याने सुनेनेच मुखाग्नी दिल्याची घटना समोर आली आहे.

मनोरनजीकच्या दहिसर तर्फे मनोर गावातील नीता गोडांबे नामक सूनेने वयाची शंभरी पार केलेल्या सासूच्या चितेला मंगळवारी स्मशानभूमीत मुखाग्नी दिला. मयत ताराबाई गोडांबे यांचे नातेवाईक लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे नीता गोडांबे यांनी मयत सासूचे अंत्यसंस्कार स्वतः करण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास ताराबाई गोडांबे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. लॉकडाऊन सुरू असल्याने मयत ताराबाई यांच्या नातेवाईकांनी ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातून दहिसर गावात अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवले.  त्यामुळे मयत ताराबाई यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला होता.

अखेरीस ताराबाई यांच्या सूनबाई नीता गोडांबे यांनी पुढाकार घेत चितेला मुखाग्नी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे सर्व स्तरांवर कौतुक केले जात आहे.
दोन भाऊ आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला व अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अनेक वर्ष सांभाळ

पाटबंधारे खात्यात नोकरीस असणाऱ्या नंदकुमार गोडांबे यांचे वीस वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना अपत्य नसल्याने नंदकुमार गोडांबे यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीता गोडांबे वयोवृद्ध सासू ताराबाई गोडांबे यांचा सांभाळ करीत होत्या.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com