Invitation to Shantigiri Maharaj of Malwadi for the cornerstone of Ayodhya | Sarkarnama

अयोध्येतील कोनशिलेसाठी मलवडीच्या शांतिगिरी महाराजांना निमंत्रण 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शांतिगिरीजी महाराजांचे गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात तीन मोठे आश्रम आहेत.  मलवडी येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. चार वर्षांपूर्वी महाराजांना जुना आखाडामधील सर्व महंतांनी मिळून आंतरराष्ट्रीय महामंत्री हे पद देऊन गौरविले आहे. 

दहिवडी (ता. माण) : अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माणच्या कोनशिला स्थापन सोहळा बुधवारी (पाच ऑगस्टला) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण माण तालुक्यातील मलवडीचे सुपुत्र व हरिद्वार येथील जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री महंत श्री शांतिगिरीजी महाराज यांना देण्यात आले आहे.
 
शांतिगिरीजी महाराजांचे गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात तीन मोठे आश्रम आहेत. महाराजांनी सातारा शहरामध्ये सात वर्षांपूर्वी दवाखान्यातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी 20 रुपये प्रतिडबा याप्रमाणे अन्नपूर्णा आहार योजना सुरू केली आहे.

याव्यतिरिक्त गुजरातमध्ये मोठी गोशाळा उभारून इतरत्र भटकणाऱ्या गाईंची सेवा ते मनोभावे करत आहेत, तसेच मलवडी येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. चार वर्षांपूर्वी महाराजांना जुना आखाडामधील सर्व महंतांनी मिळून आंतरराष्ट्रीय महामंत्री हे पद देऊन गौरविले आहे. 

शांतिगिरी देणार 51 लाख दक्षिणा...
गुजराजमधील सात मोठ्या महंतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महंत श्री शांतिगिरीजी महाराज यांचा समावेश आहे. श्रीराम मंदिर निर्मितीसाठी श्री शांतिगिरीजी महाराजांनी 51 लाख रुपये दक्षिणा दान म्हणून घोषित केली आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख