अन्‌ प्रांताधिकाऱ्यांनी क्वारंटाईन कक्षात वाटले साबण, सॅनिटायझर

प्रशासनाच्या वतीने या सर्व ठिकाणी शंभरटक्के सर्व सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत.त्यातूनही कोणी काय म्हणून प्रशासनाला दोष देत, यंत्रणेचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर दुर्दैवच. मात्र, कोणी काही म्हटले म्हणून प्रशासन थांबणार नाही.
Wai prant visit quarantine ward
Wai prant visit quarantine ward

लोणंद (ता. खंडाळा) : कोरोना संरक्षक पीपीई किट परिधान करून वाई विभागाच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी आज ( ता. १९) पाडेगांव (ता. खंडाळा) येथील समता आश्रम शाळेतील क्वारंटाईन कक्षाला भेट दिली. कक्षातील महिला व नागरीकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यांचे म्हणणे व अडचणी जाणून घेऊन त्यावर त्वरीत मार्ग काढत त्यांच्या समस्यांचे निवारणही  केले. साबण व सॅनिटायझर आदी वस्तूंचे स्वतः वाटप करून येथील महिला व नागरिकांना दिलासा दिला. त्याबद्दल क्वारंटाईन कक्षातील महिला व नागरिकांनी प्रशासनाला धन्यवाद दिले.

पाडेगांव येथील या कक्षात अनेक गैरसोयी असल्याबाबत येथे क्यारंटाईन असलेल्या महिलांच्या तक्रारीवरून भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी व अन्य भाजप कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वी लोणंद येथे पत्रकारांशी बोलताना प्रशासनाला धारेवर धरत वाई, शिरवळ व पाडेगांव येथील विलगीकरण कक्षातील गैरसोयी दूर कराव्यात. अन्यथा, या विरोधात उपोषणाचा इशारा दिला होता.

याबाबत सरकारनामा ने जोरदार आवाज उठवल्याने संपूर्ण प्रशासनाला खडबून जाग आली. आज पाडेगांव क्वारंटाईन कक्षाकडे मदतीसाठी धाव घेतली. पीपीई किट परिधान करून वाई विभागाच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी आज ( ता. १९) पाडेगांव (ता. खंडाळा) येथील समता आश्रम शाळेतील क्वारंटाईन कक्षाला भेट दिली.

प्रांताधिकारी चौगुले यांच्या समवेत खंडाळ्याचे तहसिलदार दशरथ काळे, खंडाळा तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.अविनाश पाटील, लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले व अन्य डॉक्टर्स, कर्मचारीही पीपीई किट परिधान करून उपस्थीत होते. तसेच लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष चौधरी, लोणंद प्राथमिक अरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत बागडे, डॉ. दिपक पोटे उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी सौ. चौगुले म्हणाल्या, वाई, शिरवळ, पाडेगांव येथे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल ताब्यात घेऊन क्वारंटाईन कक्ष सुरू केले आहेत. सुरुवातीचा एकदा दुसरा दिवस ॲडजेस्ट होण्यासाठी जातो. मात्र, प्रशासनाच्या वतीने या सर्व ठिकाणी शंभरटक्के सर्व सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत.

त्यातूनही कोणी काय म्हणून प्रशासनाला दोष देत, यंत्रणेचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर दुर्दैवच. मात्र, कोणी काही म्हटले म्हणून प्रशासन थांबणार नाही. लोकांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
पाडेगाव येथे शिरवळसह खंडाळा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या हाय रिक्स संपर्कातील ५५ पुरुष व ४५ महिला असे एकूण १०० जण क्यारंटाईन आहेत.

त्यांना मास्क, साबण, सॅनिटायझर, डिस्पोजेबल बेडसीटचे वाटप केले आहे.पिण्याच्या पाण्याचे कॅन, गरम पाण्यासाठी बॉयलर व सौर गिझरची व्यवस्था उपलब्ध केली आहे. शौचालयांच्या स्वच्छेतेसाठी कर्मचारी नेमले आहेत. सोशल डिस्टसिंगसाठी एका खोलीत जास्तीत जास्त तीन ते चार जणांना ठेवले आहे. दोन वेळचे जेवण, सकाळचा चहा, नास्ता, दुपारी चहा तसेच तपासणीसाठी डॉक्टर व नर्स यांच्या नेमणूका केल्या आहेत.

त्यासाठी स्थानिक खाजगी डॉक्टरांचे सहकार्य घेतले आहे. सर्व खोल्यांच्या स्वच्छतेसाठी व सॅनिटायझिंग साठी ठेकेदारांमार्फत व्यवस्था केली आहे. शाळांचे शिक्षक व कर्मचारी यांच्या नेमणूका केल्या आहेत. येथील सर्व यंत्रणेचे प्रमुख म्हणून लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांची नेमणूक केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com