माजी मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांना मातृशोक - Gunabai Jankar, Mother of Mahadeo Jankar passes away | Politics Marathi News - Sarkarnama

माजी मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांना मातृशोक

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 31 मार्च 2021

31 मार्च रोजी रात्री उशिरा अंत्यसंस्कार होणार आहेत.

सातारा : पळसावडे (ता. माण) येथील गुणाबाई जगन्नाथ जानकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने आज राहत्या घरी निधन झाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या त्या मातोश्री होत.

त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. रत्नामाला ही मोठी मुलगी. त्यानंतर दादासाहेब, सतिश आणि महादेव अशी तीन मुले झाली. सकाळमधील उपसंपादक स्वरूप जानकर हे त्यांचे नातू आणि सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर या त्यांच्या नातसून होत.

गुणाबाई जानकर यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी होय. शिक्षण घेतलेले नसले तरी त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी मोठे योगदान दिले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी मुलांचा संभाळ करून त्यांना उच्च शिक्षित केले. महादेव जानकर यांच्या संघर्षाच्या काळात आईने त्यांना साथ दिली. मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुलांना वाचायला मिळावे म्हणून घरातील कागदाचा कपटाही त्या जपून ठेवत.

महादेव जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्याशेजारील निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या कष्टाचे चीज झाले, अशीच सर्वांनी भावना त्या वेळी व्यक्त केली होती. महादेव जानकर यांनीही आपल्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात आईचे आशिर्वाद होते, असे आवर्जून सांगत होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख