स्वयंशिस्त पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाउन : शिवेंद्रसिंहराजे भोसले

मार्केट खुले आहे म्हणून विनाकारण अनेक लोक फिरतात, गर्दी करतात. मला काय होणार नाही, या भ्रमात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, असे प्रकार अनेक लोकांकडून होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे वाढती रूग्णसंख्या आहे. कोरोना आपल्या दरवाजात येऊन पोहचला आहे. आतातरी जागे व्हा. अन्यथा, परिस्थिती गंभीर होईल.
MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosale

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले असून लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून विनाकारण फिरणे, गर्दी करणे अंगलट येत आहे. स्वत:ला मर्यादा घालून स्वयंशिस्त न पाळल्यास कोरोनाचे संकट अधिक गढद होणार आहे. तसे झाल्यास पुन्हा स्वत:हून लॉकडाउन ओढावून घ्यावे लागेल, असा इशारा भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जनतेला दिला आहे.

कोरोनामुळे देशातील जनजीवन विस्कळीत आणि भयभीत झाले आहे. ही साथ वेळीच आटोक्यात येणे अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आणि उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले की, कोरोना साथीला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात दोन ते तीन महिने लॉकडाउन होता.

लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने बंद होती. छोटे- छोटे उद्योग, व्यवसाय बंद राहिल्याने हजारो- लाखो लोकांचे जगणे मुश्किल झाले होते. हातावर पोट असणार्‍या असंख्य लोकांची उपासमार होत आहे. सर्व प्रकारची दुकाने बंद असल्याने जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. आता लॉकडाउन उठविण्यात आले आहे. मात्र, गेल्या आठ- दहा दिवसांत सातारा शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे, ही चिंताजनक बाब आहे.

नागरिक स्वत: मर्यादा पाळत नाहीत, स्वत:ची काळजी घेत नाहीत. बाजारपेठ उघडी आहे, मार्केट खुले आहे म्हणून विनाकारण अनेक लोक फिरतात, गर्दी करतात. मला काय होणार नाही, या भ्रमात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, असे प्रकार अनेक लोकांकडून होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे वाढती रूग्णसंख्या आहे. कोरोना आपल्या दरवाजात येऊन पोहचला आहे.

आतातरी जागे व्हा. अन्यथा, परिस्थिती गंभीर होईल, अशी कळकळीची सुचना  शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांना केली आहे. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात येईल. याची खबरदारी सर्वांनीच घेणे बंधनकारक आहे. वाढती रूग्णसंख्या चिंताजनक बाब आहे. कोरोनाचा फैलाव रोखायचा असेल तर प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे.

रुग्णसंख्या वाढतच राहिली तर मात्र, पुन्हा लॉकडाउन अटळ आहे आणि हा लॉकडाऊन लोक स्वत:हून ओढावून घेणार आहेत. पुन्हा लॉकडाउन सारखी परिस्थती नको असेल तर, लोकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि कोरोनपासून स्वत:चे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी विनाकारण बाहेर फिरू नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेला केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com