Everything has been shut down since Corona's patient was found, so I didn't go to Pandharpur Says MP Udyanraje Bhosale | Sarkarnama

यासाठी मी पंढरपूरला जाणार नाही : उदयनराजे

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 जून 2020

सध्याच्या परिस्थितीत राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांचा विचार केला पाहिजे. यातून मार्ग निघावा यासाठी राज्यस्तरावर ठोस निर्णय घेतला पाहिजे.

सातारा : आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी जाणार होतो. पण तेथे कोरोनाचे रूग्ण सापडल्याने सर्व काही बंद करण्यात आले आहे, त्यामुळे मी पंढरपूरला जाणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे. 

सातारा जिल्हा बँकेत आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर उद्यनराजेंशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी  उद्या आषाढी एकादशी आहे, तुम्ही जाणार आहात का, या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, आषाढी एकादशीला मी साकडे घालण्यासाठी जाणार होतो. पण तेथे सर्वकाही बंद केलेले आहे. तसेच पहाटे दोन वाजता तेथे देवस्थानचे प्रमुख पुजारी व काही शासकिय अधिकाऱ्यांच्या हस्ते तेथील काकड आरती व पुजा होणार आहे. त्यामुळे मी गेलो नाही.

तुम्ही पांडुरंगाच्या चरणी कोणते साकडे घालणार होता, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांचा विचार केला पाहिजे. यातून मार्ग निघावा यासाठी राज्यस्तरावर ठोस निर्णय घेतला पाहिजे.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे येऊन काम केले पाहिजे. देशातील इतर राज्यांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे. सगळ्यात प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. त्यामुळे लोकांना राज्य शासनाकडून निर्णय अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टिका करणाऱ्यांना विचारा..... 
पडळकरांची शरद पवारांवरील टिकेबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, ज्यांनी ज्यांच्यावर टिका केली त्यांना विचारा. मी माझे मत परखडपणे मांडत आतो. माझा काहीही संबंध नाही. जे कोण बोलणार असतील त्यांचे ते बघून घेतील. याप्रकरणी माझा काय संबंध, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख