उदयनराजेंच्या प्रयत्नांमुळे रेल्वेची पुणे-सातारा शटल सुरू होणार

जिल्ह्यातील रेल्वे क्रॉसिंगवर ब्रिटिशांपासून असलेली फाटक पद्धत बंद करून तेथे स्वयंचलित फाटके व नवीन पुलांची उभारणी करावी, यासह रेल्वेसंबंधीचे अनेक प्रश्‍न व त्यावरच्या उपाययोजना त्यांनी नमूद केल्या, तसेच जिल्हा पातळीवर पुणे विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधी यांची 15 दिवसांतून एकदा बैठक बोलावून रेल्वेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी गतिमान प्रशासन पद्धत अवलंबावी, अशा सूचना केल्या.
MP Udyanraje Bhosale
MP Udyanraje Bhosale

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनांनुसार रेल्वेच्या संदर्भातील सर्व प्रश्‍नांवर तातडीने कार्यवाही केली जाईल. सातारा-पुणे शटल सेवा सुरू करण्याबाबत पुणे विभाग सकारात्मक आहे. त्यामुळे लवकरच शटल सेवा सुरू केली जाईल, अशी ग्वाही रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापिका रेणू शर्मा यांनी पुणे येथील बैठकीत दिली. 

रेल्वेच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांबाबत आज पुणे येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापिका रेणू शर्मा, रेल्वेचे कमर्शियल इंजिनिअरिंग व इतर विभागांतील अधिकारी, भूसंपादन विभागाचे अधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, भरतराव माने, रॉबर्ट मोझेस, ऍड. डी. जी. बनकर, संग्राम बर्गे, जितेंद्र खानविलकर, काका धुमाळ, शफीक इनामदार, अजय मोहिते, मनोज सोळंकी आदींसह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी पुणे विभागाच्या व्यवस्थापिका रेणू शर्मा यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे स्वागत केले. यावेळी उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध समस्या मांडल्या. ते म्हणाले, की रेल्वे लाइनचे दुहेरीकरण करण्यासाठी संपादित होणाऱ्या जमीन मालकांच्या समस्या जाणून घेऊन संपादनाची कार्यवाही पूर्ण करावी. भूसंपादनासाठी मंजूर केलेल्या 33 कोटी रुपयांपैकी केवळ एक कोटीचे वाटप झाले आहे. उर्वरित वाटप तातडीने करावे.

सातारा- पुणे रेल्वेची शटल सेवा सुरू करावी. जिल्ह्यातील रेल्वे क्रॉसिंगवर ब्रिटिशांपासून असलेली फाटक पद्धत बंद करून तेथे स्वयंचलित फाटके व नवीन पुलांची उभारणी करावी, यासह रेल्वेसंबंधीचे अनेक प्रश्‍न व त्यावरच्या उपाययोजना त्यांनी नमूद केल्या, तसेच जिल्हा पातळीवर पुणे विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधी यांची 15 दिवसांतून एकदा बैठक बोलावून रेल्वेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी गतिमान प्रशासन पद्धत अवलंबावी, अशा सूचना केल्या. 

रेणू शर्मा म्हणाल्या, ""खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनांनुसार तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल. 15 दिवसांतून एकदा जिल्हास्तरावर चर्चा व्हावी म्हणून बैठक घेऊन उपाययोजना केल्या जातील. सातारा ते पुणे शटल सेवा सुरू करण्याबाबत पुणे विभाग सकारात्मक आहे.'' लवकरच शटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com