जिल्ह्यांच्या सीमा लॉकच : अनिल देशमुख

राज्यभरात तीन हजार पोलिस कोरोनाबाधीत झाले असून 59 पोलिसमृत्यूमुखी पडले आहेत.मृत्यू झालेल्या पोलिस कुटुंबाच्या मागे शासनखंबीरपणे उभे आहे. या कुटुंबीयांना 65 लाख रुपयांची मदत, कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी तसेच संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वर्षापर्यंत त्याच्या कुटुंबाला शासकीय निवास्थानात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Home Minister Anil Deshmukh
Home Minister Anil Deshmukh

सातारा : लॉकडाउनमधील निर्बंध शासनाकडून शिथिल केले असलेतरी जिल्ह्यांच्या सीमांत पास असल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. याबाबत कडक उपाय योजना राबविण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिल्या. त्यातूनही कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संस्थात्मक विलगीकरण वाढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री देशमुख आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.
  देशमुख म्हणाले, जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे योग्य समन्वयाने काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले आहे. सुरवातीच्या टप्प्यात शहरी भागात संक्रमण होते.

परंतु, त्यानंतर जिल्ह्यात परजिल्हे व परराज्यातून लाखोंच्या संख्येने लोक आले. त्यामुळे सध्या ग्रामिण भागात संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. सुरवातील 40 ते 60 वयोगटात कोरोनाची बाधा होणारे रुग्ण जास्त होते. परंतु, आता ते तरूण पिढीत वाढू लागले आहे. 21 ते 30 वयोगटातील कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे सीमांवर विनापरवाना कोणाला सोडले जाणार नाही, याची काटेकोर
अंमलबाजवणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.  त्याचबरोबर जावळी व पाटण तालुक्‍यात इतर तालुक्‍यांच्या तुलनेत मृत्यूदर जास्त आहे. तो कमी आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. गंभीर रुग्णांवर प्रभावी ठरणारे रेमडेसिव्हीर या औषधाची किंमत जास्त होती.

त्यामुळे ते नागरिकांना परवडत नव्हते. तसेच त्याला इंडियन ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाची मान्यता नसल्याने शासनालाही ते रुग्णांना पुरवता येत नव्हते. परंतु, चारच दिवसापूर्वी त्याच्या वापरला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना हे औषध आता शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्‍वासही देशमुख यांनी व्यक्त केला.

 राज्यातील सर्वच पोलिसांनी कोरोना काळात अत्यंत चांगले काम केले. अतिदक्षता विभाग, कंटेनमेंट झोन, कॉरंटाईन वॉर्ड या ठिकाणांबरोबरच रस्त्यावर नियंत्रण आणण्यासाठी भर उन्हात पोलिसांनी काम केले. त्यामुळेच कोरोनाचा प्रसार नियंत्रित येण्यास मदत झाल्याचे सांगत देशमुख यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुकही केले. राज्यभरात तीन हजार पोलिस कोरोना बाधीत झाले असून 59 पोलिस
मृत्यूमुखी पडले.

शासन मृत्यू झालेल्या पोलिस कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबीयांना 65 लाख रुपयांची मदत, कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी तसेच संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वर्षापर्यंत त्याच्या कुटुंबाला शासकीय निवास्थानात
राहण्याची परवानगी देण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. 

मानाच्या पालख्या मंगळवारी पंढरपुरला पोचणार 

आषाढी एकादशीच्या एकदिवस आणी म्हणजे उद्या (ता. ३०) दिवशी मानाच्या नऊ पालख्या पंढरपूरला पोचण्याबाबत शासनाने नियोजन केले आहे. वातारवरणाचा  अंदाज घेऊन हवाई किंवा जमिनी मार्गाने या पालख्या पोचविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. पुढील वारी ही पूर्वी प्रमाणाचे व्हावी  याबाबत विठ्ठलाला साकडे घातले असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com