धोका कायम : साताऱ्यात कोरोनाचा आकडा सोळाशेवर 

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १६०१ वर पोहोचली असून आता रूग्णालये कमी पडू लागली आहेत. आतापर्यंत एक हजार १० रूग्ण कोरोनामुक्त झाले असून ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५२६ रूग्णांवर उपचार सुरू असून १७ हजार १३३ रूग्णांचे नमुने तपासण्यात आले आहेत.
Corona Patients Increased In Satara District
Corona Patients Increased In Satara District

सातारा : आरोग्य विभागाकडून काल (ता. 10) रात्री उशिरा आलेल्या अहवालात जिल्ह्यातील 46 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला. आज दिवसभरात विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 नागरिकांना घरी सोडण्यात आले. 490 संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, आतापर्यंत बाधितांचा आकडा 1601 पर्यंत गेला आहे. 

कोरोना बाधित रुग्णांमध्ये कऱ्हाड- सहा, सातारा- 23, जावळी- दोन, खंडाळा- सहा, महाबळेश्‍वर- एक व पाटण तालुक्‍यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यात कऱ्हाड तालुक्‍यातील मलकापुरातील दोन महिला, वाण्याचीवाडीतील महिला, बनपुरी कॉलनी येथील पुरुष, धावरवाडीमधील आठ वर्षांचे बालक, यादववाडीतील पुरुष, खटाव तालुक्‍यातील निमसोडमधील महिला, 14 वर्षीय बालक, बनपुरी येथील पुरुष, वडूजमधील पुरुष, निढळ येथील युवक.

 वाई तालुक्‍यातील व्याहळी कॉलनीतील पुरुष, सातारा तालुक्‍यातील जिहेतील 19 वर्षीय तरुण व महिला, करंडीतील तीन महिला, करंजेतील चार महिला, भरतगावमधील तीन पुरुष, तीन महिला, बोरगावातील 12 वर्षांचा बालक, पुरुष व महिला, सातारा शहरातील राधिका रोड येथील चार महिला, गार्डन सिटीतील पुरुषाचा समावेश आहे.

जावळी तालुक्‍यातील सरताळेतील पुरुष, पुनवडीमधील पुरुष, खंडाळा तालुक्‍यातील शिरवळमधील सात वर्षांचे बालक, तीन महिला, शिंदे फाटा- शिरवळमधील युवक, 14 वर्षांचे बालक, महाबळेश्वरातील पुरुष. पाटण तालुक्‍यातील निगोडे (उमरकांचन) येथील महिला, साईकडेतील महिलेचाही त्यात समावेश आहे.

 जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. त्यामध्ये शिरवळ (ता. खंडाळा) येथील दोन पुरुष, चार महिला, तांबे आळीतील पुरुष, चव्हाण आळी-शिरवळमधील युवक, शिंदेवाडीतील दोन पुरुष, शिरवळमधील युवक, सातारा तालुक्‍यातील क्षेत्र माहुलीतील पुरुष, अपशिंगे येथील तरुण, करंजेतील पुरुष, खावलीमधील पुरुष, लिंब येथील पुरुष.

पाटण तालुक्‍यातील चोपडीतील महिला, कऱ्हाड तालुक्‍यातील आगाशिवनगरातील दोन पुरुष, तुळसणमधील पुरुष व महिला, वडगाव येथील महिला, गोवारेतील युवक, कोयना वसाहतीतील पुरुष, तारूखमधील दोन पुरुष, खंडोबानगर-मलकापूर येथील महिला, जखीणवाडीतील महिला, रुक्‍मिणीनगरातील पुरुष, कऱ्हाड शहरातील शनिवार पेठेतील दोन पुरुष, तीन महिला, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेविका, हजारमाचीतील पुरुष, गोळेश्वरमधील 12 वर्षांचे बालक व महिला, खटाव येथील पुरुष.

वाई तालुक्‍यातील सोनगिरवाडीमधील पुरुष, दोन महिला, 11 वर्षांचे बालक, खानापुरातील महिला व पुरुष, वाईच्या ब्राह्मणशाहीतील पुरुष, महिला, चार वर्षांचा मुलगा व आठ वर्षांची मुलगी, बावधन नाका येथील महिला, दोन तरुणी, शिरगावातील पुरुष, खडकीतील पुरुष, महिला व तीन तरुण, कोरेगाव तालुक्‍यातील तडवळेतील महिला व सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. 

एकूण 490 जणांचे नमुने तपासणीला...
साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील 21, कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 44, (कै.) वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 67, फलटणच्या ग्रामीण रुग्णालयातील 18, कोरेगाव सेंटरमधील 51, वाई- 64, शिरवळ- 91, रायगाव- 54, पानमळेवाडी- 24, मायणी- 37, महाबळेश्वर- 5, खावली- 14 अशा एकूण 490 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आलेत. 


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com