धक्कादायक : साताऱ्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 974 वर 

सातारा जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढल्याने सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. दररोज दोन आकडी रूग्ण सापडत आहेत. काल दिवसभरात व रात्री उशीरा 47 रूग्ण सापडले. त्यानंतर आज सकाळी पुन्हा 36 कोरोनाबाधित सापडले.
corona satara
corona satara

सातारा : विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना संशयित रूग्णांपैकी 36 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी 974 वर पोहोचली आहे. 

सातारा जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढल्याने सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. दररोज दोन आकडी रूग्ण सापडत आहेत. काल दिवसभरात व रात्री उशीरा 47 रूग्ण सापडले. त्यानंतर आज सकाळी पुन्हा 36 कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हजाराकडे वाटचाल करू लागला आहे. 

आज सकाळी आलेल्या अहवालात 36 नवे बाधित आढळले आहेत. यामध्ये कऱ्हाड तालुक्‍यात तीन, पाटण तीन, माण एक, खटाव तीन, कोरेगाव चार, जावली अकरा, सातारा सात, खंडाळा तीन व वाई तालुक्‍यात एका बाधिताचा समावेश आहे. 

यामध्ये कराड तालुक्‍यातील खूबी येथील युवक, रेठरे खुर्द येथील महिला, तारुख येथील ज्येष्ठ महिला. पाटण तालुक्‍यातील सितापवाडी दोन महिला, एक पुरुष. माण तालुक्‍यातील खांडेवाडी वारुडगड येथील एक पुरुष, खटाव तालुक्‍यातील येळीव येथील ज्येष्ठ नागरीक महिला व दोन पुरुष. कोरेगाव तालुक्‍यातील बनवडीतील एक पुरुष, किरोली येथील एक पुरुष, किरोली येथील पुरुष, नागझरी येथील पुरुष.

 जावली तालुक्‍यातील रामवाडी येथील पाच महिला, 11 वर्षाचा मुलासह चार पुरुष. धोंडेवाडी येथील ज्येष्ठ नागरीक. सातारा तालुक्‍यातील गोडोली येथील एक पुरुष, जिहे येथील एक महिला, चंदननगर कोडोली येथील महिला, धावली येथील पुरुष, बोरगाव येथील पुरुष, सासपडे येथील युवक, चोरगेवाडी येथील पुरुष. खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ येथील महिला, शिरवळ येथील दोन पुरुष.

वाई सह्याद्रीनगर येथील पुरुषाचा समावेश आहे. यापैकी एक रुग्ण हा पुणे येथे स्थायिक असल्याने त्याची गणना जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत केलेली नाही. 
यासोबतच 191 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com