२५ लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस निरिक्षकास अटक

सातारा शहर पोलिस ठाण्यासमोरूनच धोंडीराम शिवाजी वाळवेकरयांना ताब्यात घेतल्यामुळे तेथे उपस्थित पोलिस कर्मचारी व काही अधिकाऱ्यांना घाम फुटला. आज (मंगळवारी) श्री. वाळवेकर यांना न्यायालयात दाखल केले जाणार असून या ठिकाणी बचाव पक्ष व लाचलुचपत विभागाचे वकिल यांच्यात युक्तीवाद होणार आहे. त्यानंतर न्यायाधीश पुढील निर्णय घेतील.
 Assistant police inspector arrested for demanding Rs 25 lakh bribe
Assistant police inspector arrested for demanding Rs 25 lakh bribe

सातारा : सातारा शहर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंडीराम शिवाजी वाळवेकर (वय 37, सध्या रा. गुरुदेव रेसिडेन्सी, तामजाईनगर, सातारा. मूळचे रा. बाजार भोगाव, ता. पन्हाळा) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर सापळा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाहूल लागल्याने श्री. वाळवेकरने यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र, पडताळणीत त्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार हे शासकिय कर्मचारी असून साताऱ्यातील शासकिय कार्यालयात ते लिपिक पदावर कार्यरत आहेत. या तक्रारदाराविरूध्द पाणी वाटपाबाबत लाखो रूपये घेऊन ती रक्कम शासनाकडे जमा न करता परस्पर लाटल्यावरून त्याच्याविरूध्द २४ फेब्रुवारी २०२० ला सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

फसवणूकीच्या गुन्ह्याचा तपास माहुली पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरिक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्याकडे आला. त्यांनी तपास करताना तक्रारदारास सातारा
शहर पोलिस चौकीत व माहुली चौकीत बोलावून घेतले जात होते. दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी व त्यामध्ये मदत करण्यासाठी वाळवेकर यांनी तक्रारदार याच्याकडे पैशाची मागणी केली होती.

लाचेची मागणी झाल्यानंतर इतक्या मोठ्या रकमेची मागणी पाहून तक्रारदाराने लाचलुचपत विभागात जाऊन पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार श्री. शिर्के यांनी तपासास सुरवात केली. यामध्ये लाचेची रक्कम २५  लाख रूपये असल्याचे समोर आले. त्यानुसार पडताळणीत २५ लाखांचीच लाचेची मागणी असल्याचे समोर आले.

त्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारण्याबाबत बोलणी सुरू होती. आठ दिवसांपासून लाच लुचपत विभाग या प्रतिक्षेत होता. मात्र, सहायक पोलिस निरिक्षक धोंडीराम वाळवेकर यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. अखेर लाचेची मागणी झाल्याप्रकरणी सोमवारी रात्री सहायक पोलिस निरिक्षक धोंडीराम वाळवेकर यांना सातारा शहर पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले.

लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अविनाश जगताप, हवालदार विनोद राजे, संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले, यांनी कारवाईत सहभाग घेतला. सातारा शहर पोलिस ठाण्यासमोरूनच धोंडीराम वाळवेकर यांना ताब्यात घेतल्यामुळे तेथे उपस्थित पोलिस कर्मचारी व काही अधिकाऱ्यांना घाम फुटला.

आज (मंगळवारी) श्री. वाळवेकर यांना न्यायालयात दाखल केले जाणार असून या ठिकाणी बचाव पक्ष व लाचलुचपत विभागाचे वकिल यांच्यात युक्तीवाद होणार आहे. त्यानंतर न्यायाधीश पुढील निर्णय घेतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com