एक लाख युवकांना रोजगार देणार; 'महाविकास'चे सरकार कार्यकाल पूर्ण करेल : सुभाष देसाई - Will provide employment to one lakh youth; The government of Mahavikas will complete its term Says Shivsena Minister Shubhash Desai | Politics Marathi News - Sarkarnama

एक लाख युवकांना रोजगार देणार; 'महाविकास'चे सरकार कार्यकाल पूर्ण करेल : सुभाष देसाई

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

देशा्त अनेक पक्ष आहेत. त्यामुळे कोणी काँग्रेस मुक्त भारत किंवा भाजप मुक्त भारत करेन म्हणणे चुकीचे आहे. लोकशाही प्रगल्भ झाली आहे, त्याचे कौतूक आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे दोष दाखविले पाहिजे. तसेच त्यांच्याशी स्पर्धा करायला हवी. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अंगावर घ्यायची तयारी असली पाहिजे, असेही त्यांनी नमुद केले. 

सातारा : जून व ऑक्टोंबरमध्ये राज्य सरकारने अनेक कंपन्यांशी सामंज्यस करार केले आहेत. त्यानुसार अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत. ग्रामीण युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आम्ही ५१ हजार कोटी रूपयांचे विविध ३० कंपन्यांशी करार केलेले आहेत. त्यातून एक लाख युवकांना रोजगार मिळणार आहेत, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान, सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून पुढील चार वर्षाची मजबूत तयारीही आम्ही केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आपला कालावधी पूर्ण करून महाराष्ट्राला सुखी करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीबाबत ते बोलत होते. सध्या नोटीसांचे वारे वाहत आहे. आपल्याला अशी काही नोटीस असलेली आहे का, या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, मला कसलीही नोटीस आलेली नाही व येण्याचीही शक्यताही नाही. नोटीसांबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली आहे. अशा नोटीसांमुळे कोणी विचलित होणार नाही. पण यातून त्रास देण्यासाठी कोणी नोटीसा पाठवित असेल तर पक्ष व संघटनेच्या माध्यमातून त्याचा समाचार घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

सरकारच्या वर्षपूर्तीचा अनुभव कसा वाटला, यावर मंत्री देसाई म्हणाले, हे वर्ष अगदी आगळेवगळे गेले आहे. अनपेक्षितपणाने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन या वर्षाची सुरवात झाली. यापूर्वीच्या सरकारमध्येही मी मंत्री हातो. त्यामुळे मला मंत्रीपद मिळणे हे आश्चर्यकारक नाही. पण सरकार स्थापन होणे ही सर्वाना अश्चर्यकारक वाटले. महाविकास आघाडीच्या सरकारने वर्ष पूर्ण केले असून पुढील चार वर्षाची मजबूत तयारी आम्ही केली आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कालावधी पूर्ण करेल व महाराष्ट्राला सुखी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे आमच्या सोबत इतकी वर्षे होते ते आमच्या विरोधात गेले आहेत. जे आमच्या विरोधात होते, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. हा लोकशाहीचा चमत्कार असून लोकशाहीचे वेगळे रूप यानिमित्ताने पहायला मिळाले. आम्ही काँगेस सोबत आलो म्हणून आश्चर्य वाटायचे कारण नाही.

देशा्त अनेक पक्ष आहेत. त्यामुळे कोणी काँग्रेस मुक्त भारत किंवा भाजप मुक्त भारत करेन म्हणणे चुकीचे आहे. लोकशाही प्रगल्भ झाली आहे, त्याचे कौतूक आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे दोष दाखविले पाहिजे. तसेच त्यांच्याशी स्पर्धा करायला हवी. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अंगावर घ्यायची तयारी असली पाहिजे, असेही त्यांनी नमुद केले. राज्यातील उद्योग शंभर टक्के सुरू झालेत काय, या प्रश्नावर ते म्हणाले, शंभर टक्के नाही पण ७० ते ८० टक्के उद्योग सुरू आहेत.

बाजारपेठातील मागणी वाढल्याने उत्पादन वाढविले आहे. त्यामुळे कोणत्याच वस्तूची टंचाई दिसत नाही. पण शंभर टक्के उद्योग लवकरच सुरू होतील. तसेच जुन्या प्रमाणे नवीन उद्योग सुरू झाले पाहिजेत. युवकांना रोजगार मिळावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रश्न कसा सोडविणार याविषयी ते म्हणाले,  जून व ऑक्टोंबरमध्ये महिन्यात आम्ही अनेक सामंज्यस करार केले आहेत.
त्यानुसार अनेक उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत. 

राज्याची भरभराट व्हावी, उत्पन्न वाढावे, तसेच नोकऱ्या वाढाव्यात
हा यामागचा आमचा उद्देश आहे. ग्रामीण युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आम्ही ५१ हजार कोटी रूपयांचे विविध ३० कंपन्यांशी करार केलेले आहेत. त्यातून एक लाख रोजगार मिळणार आहेत. यामध्ये नवीन मुंबईत डेटा सेंटर, माहिती तंत्रज्ञान, पुण्यात हिंजवडी, चाकण परिसरात इंजिनिअरींग उद्योग, रायगड, नवी मुंबई परिसरात अन्न प्रकिया उद्योग, संभाजीनगरमध्ये शेंद्रा बिडकिन (डीएमआयसी) परिसरात ऑरिक नावाची उद्योग नगरी निर्माण झाली आहे.

रायगड परिसरात औषधी उत्पादनाचे मोठे उद्यान उभारण्यात येत आहे. येथे देशातील तसेच परदेशातील कंपन्या सहभागी होणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारमधील वाद कधी संपणार, या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, केंद्र सरकारकडे राज्याचा जीएसटीचा हक्काचा वाटा आहे. तो वेळच्यावेळी परत
राज्यांना दिला पाहिजे. आम्हीच नव्हे तर ममता बॅनर्जीनीही हा वाटा वेळेत मिळावा, अशी मागणी केले आहे. ही देशभरातील राज्यांची समस्या आहे. आपत्तीच्या काळात राज्यांना मदत करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. केंद्राचा हिस्सा वेळेत येत नाही. त्यालाच असे वादाचे स्वरूप दिले जाते.

आयारामांना थोपविण्यासाठी भाजपकडून सत्ता बदलाचे गाजर....

विरोधकांकडून सातत्याने दोन महिन्यात सत्तापालट होईल, असे सांगितले जात आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता मंत्री देसाई म्हणाले, अशी विधाने विरोधकांकडून सुरवातीपासून होत आहेत. सुरवातीला अकरा दिवसांचा वायदा देऊन झाला. त्यात त्यांचीच निराशा झाली. आता वेगवेगळे वायदे व तारखा दिल्या जात आहेत. कारण त्यांच्याकडे आयाराम आहेत. त्यांना गाजर दाखवून पक्षात आणलेले आहे. आता सत्ता नसताना त्यांना कसे थांबवायचे. त्यामुळे भाजप सत्तेसाठी बेचैन आहे.त्यांच्यात चलबिचल सुरू आहे. आयारामांना पक्षात थांबविण्यासाठी सरकार येईल किंवा मी पुन्हा येईन, असे सांगत आहेत. पण महाविकास आघाडीची पाच वर्षे कशी गेली हेही त्यांना कळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख