सातारा : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या माध्यमातून भाजपला खिंडार पाडण्यात यश आल्याने सोशल मिडियावर राष्ट्रवादीचा गजर घुमू लागला आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचा विजयाची केवळ औपचारिकता राहिलेली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर
निवडणूक अधिकारी यांच्याकडून लाड यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान लाड यांच्या निर्णायक आघाडीनंतर सोशल मिडियावर महाविकासच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास प्रारंभ केला आहे. काहींनी विरोधकांचे जूने, नवे
व्हिडिओ पोस्ट करुन आता कसं वाटतय... अशी मिश्किल टिप्पणी केली. तर काहींनी राष्ट्रवादी पून्हा.., हम एक है... असा नारा दिला आहे.
तसेच राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी श्री. अरूण लाड यांच्यासमवेत असलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत त्यांचे अभिनंदन केले आहे. एकुणच अरूण लाड यांच्या विजयानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

