सातारा : विलासराव पाटील उंडाळकर यांचे संपूर्ण आयुष्य जनतेच्या प्रश्नांसाठी समर्पित होते. जिल्हा बँकेचे संचालक ते ३५ वर्षे कऱ्हाड दक्षिणचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विलासकाका उंडाळकरांना श्रध्दांजली वाहिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विलास काका उंडाळकर यांच्या निधनाचे वृत्त समजले. त्यांचे संपूर्ण आयुष्य जनतेच्या प्रश्नांसाठी समर्पित होते.
सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक ते सलग ३५ वर्षे दक्षिण कराड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांना नेहमीच आग्रही भूमिका मांडली. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

