लागीर झालं फेम ''जीजी'' काळाच्या पडद्याआड  - Veteran actress Mrs. Kamal Thoke passed away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

लागीर झालं फेम ''जीजी'' काळाच्या पडद्याआड 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

श्रीमती कमल ठोके यांनी शिक्षकीपेशा सांभाळत अभिनय जागृत ठेवत नाटक, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतही काम केले. सासर माहेर, सखा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या.

कऱ्हाड : येथील ज्येष्ठ अभिनेत्री व माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके (वय 74) यांचे आज सायंकाळी बंगलुरू येथे निधन झाले. मराठी चित्रपट सृष्टीत त्या ''जीजी'' म्हणून ओळखल्या जात होत्या. झी मराठी वाहिनीवरील 'लागीर झालं जी' या मालिकेतून त्या घराघरात पोचल्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या.

त्यांच्यावर बंगळुरू येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काल (ता. १४) सायंकाळी त्यांचे निधन झाले. श्रीमती कमल ठोके यांनी शिक्षकीपेशा सांभाळत अभिनय जागृत ठेवत नाटक, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतही काम केले. सासर माहेर, सखा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या.

शिक्षकीपेशातून निवृत्तीनंतरही त्यांनी अभिनयाची सेवा केली. अल्पावधित प्रसिद्धीचे शिखर पार करणारी झी मराठीची ''लागीर झालं जी'' या मालिकेतून त्या घरा घरात ''जीजी'' या नावाने परिचित झाल्या आणि नावलौकिक
मिळविला. 

श्रीमती ठोके यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज (रविवारी) कऱ्हाडला सकाळी सहा वाजता त्यांच्या मंगळवार पेठ कमळेश्वर मंदिर येथील निवासस्थानी आणणात आला. अंत्यदर्शनासाठी काही वेळ ठेऊन सकाळी साडे दहा वाजता कमळेश्वर मंदिराशेजारील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख