सोलापूर वाहतूक शाखेतील पोलिस नाईक पाटील, शेख निलंबित - Two Police Suspended in Solapur Traffic Branch | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापूर वाहतूक शाखेतील पोलिस नाईक पाटील, शेख निलंबित

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

सोलापूर शहरात सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीसाठी जड वाहतूकीस बंदी आहे. तरीही शहरात अनेक महामार्गावरून आणि चोरट्या रस्त्याने शहरात जड वाहतूक होते. त्याकडे शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

सोलापूर : जड वाहतूक बंदीच्या काळात अक्‍कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगरजवळ झालेल्या अपघातप्रकरणी सोलापूर शहर वाहतूक शाखेचे पोलिस नाईक लक्ष्मण पाटील व आफताब शेख या दोघांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. 

चार डिसेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास जड वाहतूक बंदीच्या काळात अक्‍कलकोट रस्त्यावरून शहरात येणाऱ्या मालट्रक चालकाने ट्रक भरधाव चालवून मोटारसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात जुलेखा मुर्तूज शेख आणि मोहसिन मेहबूब पठाण दोघांचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले होते.

याप्रकरणी निष्काळजीपणा करणारे सोलापूर शहर उत्तर वाहतूक शाखेतील पोलिस नाईक लक्ष्मण पाटील आणि आफताब शेख यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त शिंदे यांनी दिले. सोलापूर शहरात सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीसाठी जड वाहतूकीस बंदी आहे. तरीही शहरात अनेक महामार्गावरून आणि चोरट्या रस्त्याने शहरात जड वाहतूक होते.

त्याकडे शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. ज्यावेळी अपघात होतो आणि एखाद्याचा जीव जातो, त्याच वेळेस वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी होते. इतरवेळी हे कर्मचारी काय करतात याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख