आजचा वाढदिवस : शंभूराज देसाई (गृहराज्यमंत्री, वाशिमचे पालकमंत्री) - Today's Birthday: Shambhuraj Desai (Minister of State for Home Affairs, Wasim's Guardian Minister) | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : शंभूराज देसाई (गृहराज्यमंत्री, वाशिमचे पालकमंत्री)

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

मोरणा शिक्षण मंडळाचे मार्गदर्शक, लोकनेते बाळासाहेब देसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर संघाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे ते  अध्यक्ष आहेत. शिवदौलत सहकारी बँकेचे संस्थापक, मार्गदर्शक आहेत.

शंभूराज शिवाजीराव देसाई यांचे मुळगाव मरळी (ता. पाटण) असून ते पाटण मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. सध्या ते गृह, वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री आहेत. तसेच वाशिमचे पालकमंत्री आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. श्री. देसाई यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला आहे.

2004 मध्ये ते पाटण मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार झाले. त्यानंतर
2014, २०१९ मध्ये तिसऱ्यांदा याच मतदारसंघातुन आमदार झाले. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते गृह, वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री आहेत. तसेच वाशिमचे पालकमंत्री आहेत.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे सदस्य आहेत. मोरणा शिक्षण मंडळाचे मार्गदर्शक, लोकनेते बाळासाहेब देसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर संघाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे ते  अध्यक्ष आहेत. शिवदौलत सहकारी बँकेचे संस्थापक, मार्गदर्शक आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख