पृथ्वीराज चव्हाणांना तिसऱ्या दिवशी दगा देणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये...... - Those who live only on percentage should not take our measurements says Vinayak Pawaskar | Politics Marathi News - Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाणांना तिसऱ्या दिवशी दगा देणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये......

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 मार्च 2021

राजेंद्र यादव, त्यांचा व्यवसायाची कराड शहराला कल्पना आहे. त्याबाबत मी वेगळ काही बोलायचे कारण नाही. नागरीक तेवढे सुज्ञ आहेत. अनेक वर्षापासून आपले आमदार होण्याचे स्वप्न अतृप्त आहे. त्यामुळेच आपण शहाराला त्रास देत आहात.

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा घेऊन कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत बहुमत मिळलेल्या राजेंद्र यादव यांच्या गटाने तिसऱ्या दिवशी चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांचा घात करून पलटी मारली. यादव ज्या जनशक्ती आघाडीचे नाव लावतात. त्या आघाडीचे अध्यक्ष अरूण जाधव यांना त्यांनी कधी पालिकेत बोलवले नाही. अस केवळ खोट करण्याची परंपरा असलेल्या आणि केवळ टक्केवारीवर आयुष्य चालवणाऱ्यांनी आमची मापे काढू नयेत, अशी टीका कराड पालिकेतील भाजपचे गटनेते ज्येष्ठ नगरसवेक विनायक पावसकर यांनी केली. 

श्री. पावसकर म्हणाले, स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या यादव त्यांच्याच वार्डात निवडून येऊ शकले नाहीत. याचेही त्यांनी भान ठेवावे. त्यामुळे यादवांचा विकास म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. अर्थसंकल्पाच्या सभेत उपसूचना जनशक्ती आघाडीने मांडलीच नाही. ती आजतायगत मिळालेली नाही. मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेली नाही. त्यामुळे सूचना मंजूर आहे.

पहिल्या निवडणुकीपासून राजेंद्र यादव यांना नैतिकता ठेवता आलेली नाही. 1999 मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत त्यांचा प्रचार केला. निवडून आल्यानंतर आमच्या सभागृहात सत्कार स्विकारून तिसऱ्या दिवशी यादव सत्ताधारी (कै) जयवंत जाधव यांच्या गटाकडे बसले. त्यावेळी नैतिकात कुठे गेली होती. अलीकडच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा घेवून निवडणुका लढवून त्यांनी बहुमत आणले.

मात्र तुम्हाला लोकांनी नाकरल्याने लगेच तिसऱ्याच दिवशी तुम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचा घात करून पलटी मारली. तिसऱ्या दिवशीचे गणित नेमके काय तेच कळत नाही. त्यामुळे तुम्ही नैतिकता शिकवण्याची गरज नाही. ज्या जनशक्तीचे तुम्ही नाव लावता आघाडीचे अध्यक्ष अरूण जाधव यांनाही तुम्ही कधी पालिकेत बोलवले नाही. त्यांच्याशी चर्चा न करता थेट खोट सांगून कारभार केलात.

जनशक्तीचे गटनेते असतानाही यशवंत विकास आघाडीचे गटनेते अशी पाटी लावून जनशक्तीचाही घात राजेंद्र यादव यांनी केला आहे. निवडणूका आल्या की, निर्धार, पाठिंबा मेळावे तुम्ही घेता ते आर्थिक मेळावे असतात ते पाठिंब्यासाठी दाखवले जातात. आम्ही जिकडे तिकडे विजय असे जाहीर करता. मात्र, त्याच जनतेने तुम्हाला घरी बसवले हे विसरू नका.

भाजपचे नगरसवेक टक्केवारीत आहेत, असा आरोप करताना यादव यांनी आपले आयुष्यच टक्केवारीचे हे विसरता कामा नये. टक्केवारी शिवाय यादव जगूच शकत नाही. विनायक पावसकर यांचा व्यवसाय, व्यक्तीमत्व शहराला माहिती आहे. त्याच पद्धतीने राजेंद्र यादव, त्यांचा व्यवसाया याचाही शहराला कल्पना आहे. त्याबाबत मी वेगळ काही बोलायचे कारण नाही. नागरीक तेवढे सुज्ञ आहेत. अनेक वर्षापासून आपले आमदार होण्याचे स्वप्न अतृप्त आहे. त्यामुळेच आपण शहाराला त्रास देत आहात. यावेळी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, फारूक पटेवकर, सुहास जगताप व विद्या पावसकर उपस्थित होते. 
 

यादवांना जनतेने नाकारले....

 

राजेंद्र यादव यांच्यावर नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनीही टीका केली. त्या म्हणाल्या, नैतिकतेचे कारण पुढे करून कायम माझ्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या यादव यांनी मला जनतेने निवडून दिले आहे. त्याचे भान ठेवावे. नैतिकता काय असते, हे सातत्याने दिसून आले आहे, म्हणूनच त्याच जनतेने तुम्हालाही घरी बसवले आहे. टक्केवारीवर तुम्ही जगता आम्ही नाही. गावाचा विकास हेच आमचे ध्येय आहे, ते यापुढेही आम्ही कायम ठेवणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख