''कृष्णा''च्या त्या सहा हजार सभासदांना मिळाला मतांचा अधिकार 

ज्यांच्या उसाची नोंद आहे, त्यांचा ऊस जाणीवपूर्वक तोडलेला नाही. त्यांच सभासदांना नोटिसा दिल्या आहेत. ठराविक गावात नोटिसा दिल्या होत्या.ऊस न पुरविलेल्या काहींना मुद्दाम नोटिसा दिल्या नाहीत. यंदाच्या 2020-21 च्या आर्थिक वर्षात कोरोना संकटात नोटिसा पाठवल्या आहेत, असे मुद्दे मांडले.
Krishna Sugar Mill Avinash Mohite
Krishna Sugar Mill Avinash Mohite

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सहा हजार 368 सभासदांना सत्ताधारी संचालक मंडळाने वर्षभरापासून अक्रियाशील ठरवले होते. मात्र, संस्थापक पॅनेलने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती. त्यानुसार सहकारमंत्री पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात सहकार कायद्यात सुधारणा करण्याच्या मांडलेल्या प्रस्तावास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे "कृष्णा' च्या सहा हजार 368 सभासदांचा मतदान हक्क कायम राहिला आहे, अशी माहिती संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते यांनी दिली.
 
कायद्यातील पळवाट शोधून काही ठराविक सभासदांवर अन्याय करण्यात येत होता. मात्र, तो कायद्याने अमान्य करण्यात आला आहे, असे सांगून श्री. मोहिते म्हणाले, ""कारखान्यातर्फे 2019-20 च्या सभासदांना अक्रियाशील करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या.

नोटिसा काही विशिष्ट गाव आणि व्यक्तींना आल्या होत्या.  त्यात संस्थापक पॅनेलच्या समर्थकांची संख्या जास्त होती. त्याप्रकरणी संस्थापक पॅनेलतर्फे प्रादेशिक साखर सहसंचालक व सहकार न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यासंबंधी निर्णय प्रलंबित आहे. मात्र, या विषयीचा संपूर्ण तपशील सहकारमंत्री पाटील यांच्यासमोर
मांडला. त्यात पक्षपातीपणे सभासदांना अक्रियाशील ठरवले आहे.

ज्यांच्या उसाची नोंद आहे, त्यांचा ऊस जाणीवपूर्वक तोडलेला नाही. त्यांच सभासदांना नोटिसा दिल्या आहेत. ठराविक गावात नोटिसा दिल्या होत्या. ऊस न पुरविलेल्या काहींना मुद्दाम नोटिसा दिल्या नाहीत. यंदाच्या 2020-21 च्या आर्थिक वर्षात कोरोना संकटात नोटिसा पाठवल्या आहेत, असे मुद्दे मांडले.

त्याचा विचार करून सहकारमंत्री पाटील यांनी सहकार खात्यातील वरिष्ठ  अधिकाऱ्यांना त्याबाबत योग्य मार्ग काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहकार खात्याने सुधारणा करणारा प्रस्ताव तयार केला. मंत्रिमंडळाच्या 22 जुलैच्या बैठकीत मांडून तो मंजूर केला आहे. 2020-21 च्या आर्थिक वर्षात कारखान्याने दोन हजार 648 सभासदांना अक्रियाशील करण्यासंदर्भात नोटिसा पाठवलेल्या नोटिसा निरर्थक ठरल्या आहेत. 

सातारा सातारा सातारा 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com