फलकाचा तणाव निवळला अन्‌ अजित पवार साताऱ्यात दाखल झाले.... - The tension on the board was eased and Ajit Pawar arrived in Satara .... | Politics Marathi News - Sarkarnama

फलकाचा तणाव निवळला अन्‌ अजित पवार साताऱ्यात दाखल झाले....

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 जानेवारी 2021

श्री. पवार थेट एक नंबरच्या सूटमध्ये गेले. तेथे थोडावेळ थांबले, तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करताना नवीन  विश्रामगृहाच्या कामाचे कुठपर्यंत आलेय, तसेच ग्रेडसेपरेटरच्या कामाचीही माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर श्री. पवार तातडीने शिरवडेकडे जाण्यास निघाले. त्यांच्यासोबत सुनील मानेही रवाना झाले.

सातारा : साताऱ्यात ग्रेडसेपरेटरचा फलक फटल्याचा विषय ताजा असतानाच दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येथील शासकीय विश्रामगृहात एंट्री झाली. कऱ्हाडला जाताना ते अचानक साताऱ्यात थांबल्याने अनेकांना धक्का बसला. या वेळी त्यांनी महसूल व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी अल्पवेळ कमराबंद चर्चा केली. ग्रेडसेपरेटरचे शासकीय उद्‌घाटन होण्याचे संकेत या निमित्ताने मिळू लागले आहेत.

 कऱ्हाड तालुक्‍यातील शिरवडे व उंडाळेकडे जाताना उपमुख्यमंत्री पवार आज दुपारी शासकीय विश्रामगृहात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तातडीने पोलिस शासकीय विश्रामगृहात पोचले. श्री. पवार यांचा ताफा विश्रामगृहात पोचला.

त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, बांधकाम विभागाचे अभियंता श्री. आंबेकर उपस्थित होते. 

त्यानंतर श्री. पवार थेट एक नंबरच्या सूटमध्ये गेले. तेथे थोडावेळ थांबले, तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करताना नवीन  विश्रामगृहाच्या कामाचे कुठपर्यंत आलेय, तसेच ग्रेडसेपरेटरच्या कामाचीही माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर श्री. पवार तातडीने शिरवडेकडे जाण्यास निघाले. त्यांच्यासोबत सुनील मानेही रवाना झाले.

साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरच्या उद्‌घाटनाच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या फलक फाटण्याच्या प्रकारानंतर अचानक उपमुख्यमंत्री पवार यांची झालेली एंट्री राजे समर्थकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. कदाचित ग्रेडसेपरेटरचे शासकीय उद्‌घाटन घेतले जाण्याचे संकेत श्री. पवार यांच्या या अल्पवेळ दौऱ्यामुळे मिळू लागले आहेत. 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख