काँग्रेसच्या व्यापक बांधणीसाठी सोनिया गांधी सकारात्मक : पृथ्वीराज चव्हाण - Sonia Gandhi is positive for the broader structure of the Congress says Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या व्यापक बांधणीसाठी सोनिया गांधी सकारात्मक : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 19 डिसेंबर 2020

श्री. चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष संघटनेसाठी सुचविलेल्या मुदयांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही बैठक आयोजित केली होती. पाच तास चाललेल्या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. प्रत्येकाला बोलण्यासाठी वेळ देण्यात आला होता.

कऱ्हाड : काँग्रेस पक्षाच्या व्यापक बांधणीबाबत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी सकारात्मक आहेत. लवकरच काही महत्वाचे निर्णय होवू शकतील. त्यासाठी काही बैठका होऊन त्यावर निर्णय होईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.  

श्रीमती गांधी यांनी आज दिल्ली येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण उपस्थिती आहेत.  बैठक सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु होती. बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  

श्री. चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष संघटनेसाठी सुचविलेल्या मुदयांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही बैठक आयोजित केली होती. पाच तास चाललेल्या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. प्रत्येकाला बोलण्यासाठी वेळ देण्यात आला होता.

काँग्रेस अध्यक्षांच्या सूचनेनुसार अशा अजून काही बैठक यापुढे होणार आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी जे मुद्दे मांडले होते, ते पक्ष मजबुतीसाठी होते. यासाठी पुढील आणखी काही बैठकीत यामध्ये चर्चा केली जाणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख