पदवीधर, शिक्षक निवडणुकीत 'महाविकास'च्या तिन्ही पक्षांची ताकद दाखवून द्या : पृथ्वीराज चव्हाण - Show the strength of the three parties of 'Mahavikas' in the graduate and teacher elections: Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

पदवीधर, शिक्षक निवडणुकीत 'महाविकास'च्या तिन्ही पक्षांची ताकद दाखवून द्या : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

या निवडणुकीसाठी मतदारसंघ मोठा आहे. पाच जिल्ह्यात उमेदवाराला प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे शक्य होईल, असे नाही. यासाठी आपण सर्वांनी स्वतः उमेदवार आहोत असे समजून प्रचार करावा. तरच आपल्याला यश मिळेल.  पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सोडवले जातील. यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे.

कऱ्हाड : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दाखवून देणे गरजेचे आहे. ही निवडणूक विचारांची असून ती आपण जिंकणे महत्वाचे आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. यासाठी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कऱ्हाडात कार्यकर्ता मेळावा झाला.

यावेळी युवा नेते उदयसिंह पाटील उंडाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड, रणजित लाड, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांचे प्रतिनिधी श्री. वाळके, दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, राजेंद्र माने, उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. यासाठी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत. निवडणुकीत एक-एक मत महत्वाचे असते. तसेच या निवडणुकीत एक एक मत महत्वाचे आहे.

यासाठी प्रत्येक मत मतपेटीत जाण्यासाठी मतदारांना अधिकाधिक जागृत करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणे हा महत्वाचा उपक्रम राबविला गेला. तो यशस्वी होताना दिसत आहे. तिन्ही पक्षांची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून आपण दाखवून देणे गरजेचे आहे, ही निवडणूक विचारांची आहे आणि ही आपण जिंकणे महत्वाचे आहे.

या निवडणुकीसाठी मतदारसंघ मोठा आहे. पाच जिल्ह्यात उमेदवाराला प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे शक्य होईल, असे नाही. यासाठी आपण सर्वांनी स्वतः उमेदवार आहोत असे समजून प्रचार करावा. तरच आपल्याला यश मिळेल.  पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सोडवले जातील. यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख