गावाच्या विकासासाठी मंत्री म्हणून कुठेही कमी पडणार नाही : शंभूराज देसाई - Shivsena's lead in GramPanchayat elections in Patan taluka is heavy | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

गावाच्या विकासासाठी मंत्री म्हणून कुठेही कमी पडणार नाही : शंभूराज देसाई

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 11 जानेवारी 2021

ग्रामपंचायतीच्या निवडणूकांत मंत्री देसाईंचे व शिवसेना पक्षाचे पारडे जड असून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 36 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये 21 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पक्षाचे वर्चस्व आहे. अंशत: बिनविरोध झालेल्या 50 ग्रामपंचायतीत12 ठिकाणी शिवसेनेचे बहूमत आहे. 

पाटण : गावाच्या विकासासाठी मी मंत्री म्हणून कुठेही कमी पडणार नाही. मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. जनतेच्या आर्शिवादानेच हे सर्व शक्य झाले असून मंत्री असलो तरी ''घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिला पाशी'' या म्हणीप्रमाणे माझे लक्ष पाटण मतदारसंघातील जनतेवर आहे. निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतीत बारकाईने लक्ष घालून जास्तीत जास्त सदस्य शिवसेना पक्षाचे निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. 

पाटण विधानसभा मतदारसंघात 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असून पहिल्या टप्प्यात 36 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध
झाल्या तर 50 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध झालेल्या एकूण 86 ग्रामपंचायतीतील 393  सदस्यांपैकी 256 सदस्य हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानणारे आहेत.

गेले दोन दिवस मतदारसंघातील 54 ग्रामपंचायतीतील शिवसेनेच्या 204 सदस्यांनी मंत्री देसाई यांची दौलतनगर येथे भेट घेतली. बिनविरोध सदस्यांचे गृहराज्यमंत्री यांनी अभिनंदन करीत भेटीला आलेल्या सदस्यांचा त्यांनी सत्कार केला. सातारा जिल्हयात सर्वात जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणूका पाटण विधानसभा मतदारसंघात होत आहेत.

यातील पाटण तालुक्यात 107 व मतदारसंघातील सुपने-तांबवे पंचायत समिती गणात 12 अशा एकूण 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. पाटण मतदारसंघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे पाटण मतदारसंघातील निवडणूकांकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणूकांत मंत्री देसाईंचे व शिवसेना पक्षाचे पारडे जड असून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 36 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये 21 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पक्षाचे वर्चस्व आहे. अंशत: बिनविरोध झालेल्या 50 ग्रामपंचायतीत12 ठिकाणी शिवसेनेचे बहूमत आहे. 

निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये बारकाईने लक्ष घालून जास्तीत जास्त सदस्य शिवसेना पक्षाचे करण्याचे आवाहन शंभूराज देसाईंनी
यावेळी उपस्थित सदस्य, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना केले. ते म्हणाले, भविष्यात या ग्रामपंचायतीत चांगले काम होण्यासाठी येथील सदस्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.

गावाच्या विकासासाठी मी मंत्री म्हणून कुठेही कमी पडणार नाही. मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. जनतेच्या आर्शिवादानेच हे सर्व शक्य झाले असून मंत्री असलो तरी ''घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी'' या म्हणीप्रमाणे माझे लक्ष पाटण मतदारसंघातील जनतेवर आहे.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख