गृहराज्यमंत्र्यांकडून गोरगरीबांना मायेची ऊब; स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक - Shivsena Minister Shambhuraj Desai's help to the poor people | Politics Marathi News - Sarkarnama

गृहराज्यमंत्र्यांकडून गोरगरीबांना मायेची ऊब; स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 6 डिसेंबर 2020

मंत्री देसाई यांनी वाढदिवसाच्या आनंदात पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील सदस्यांना, महिलांना व लहान मुलांना सहभागी करुन घेतले. पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील गावागावात मदत पोचविली आहे.

सातारा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पाटण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविले. मतदारसंघातील ग्रामीण भागातील अत्यंत गरीब कुटुंबातील सदस्यांना पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर 5400 ब्लॅकेंट, 5400 महिलांना साडया, 5400 शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनींना शालेय साहित्य, बिस्कीटे व राजगिऱ्याच्या लाडूचे पॅकेट तसेच कोरोनापासून बचावाकरीता 5400 मास्क अशा मदतीचे वाटप केले. पाटण मतदारसंघातील गांवागावांत ही मदत पोचविण्याचे उल्लेखनीय काम त्यांनी केले आहे. 

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कोरोना महामारीमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंत्री देसाई यांनी वाढदिवसाच्या आनंदात पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील सदस्यांना, महिलांना व लहान मुलांना सहभागी करुन घेतले. पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील गावागावात मदत पोचविली आहे.

शंभूराज देसाई यांचा या वर्षी 54 वा वाढदिवस असल्याने यानिमित्त 5400  ब्लॅकेंट, 5400 साडया, 5400  शालेय साहित्य,बिस्कीट व पाच राजगिऱ्याचे लाडूचे पॅकेट व 5400 मास्क वाटप करण्याचा अनोखा उपक्रम त्यांनी राबविला. या त्यांच्या उपक्रमाचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.

त्याचबरोबर मंत्री देसाई यांनी वाढदिवसानिमित्त शिवसेना सदस्य नोंदणींच्या उपक्रमात पाटण मतदार संघातून शिवसेना पक्षप्रमुख व  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक लाख शिवसेना सदस्य नोंदणीची अनोखी भेट देण्याचे उदिष्ट ठेवले होते. त्यानुसार वाढदिवसादिवशी  71 हजार सदस्य नोंदणी करण्यात आली. सातारा जिल्हयाकरीता तीन लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट होते. त्यातील 71 हजार शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख