शशिकांत शिदेंच्या स्थलांतराने शिवेंद्रसिंहराजे भडकले

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूकीत पक्षाला मतदान केले म्हणून त्यांचा ऊस वेळेवर नेला जात नाही. यासंदर्भात जिल्ह्यातून कार्यकर्ते माझ्याकडे येऊन त्यांच्या तक्रारी घेऊन येतात. त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. त्यानुसार मी त्यांना मदत करतो. त्यामुळे मी शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान देतो, असे नाही.
Shivendrasinharaje was incensed by the migration of Shashikant Shide
Shivendrasinharaje was incensed by the migration of Shashikant Shide

सातारा : मला विधान परिषदेची आमदारकी देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्ष संघटना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे. शिवेंद्रसिंहराजे हे भाजपचे आमदार असल्याने मी जावळी तालुक्‍यात लक्ष घालून राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पक्षाने मला सातारा-जावळीतून उभे राहावे, अशी सूचना केलेली आहे. त्यामुळे पक्ष संघटना वाढवित असताना त्यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करतोय, असे त्यांना वाटले असेल. शिवेंद्रसिंहराजेंशी माझा वैयक्तिक वाद नाही, पण पक्ष स्तरावर आमचा वाद होऊ शकतो, असे प्रतिउत्तर आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले आहे. 

साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे काल कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे व उदयनराजेंवर भडकले. त्यांनी थेट शशिकांत शिंदेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान दिले. यावर आमदार शशिकांत शिंदेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माझा आणि शिवेंद्रसिंहराजेंचा वैयक्तिक वाद नाही. पण पक्ष स्तरावर आमचा वाद होऊ शकतो.

मला विधान परिषदेची आमदारकी देताना पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्ष, संघटना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार सातारा व जावळी मतदारसंघात सध्या भाजपचा आमदार असल्याने मी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची पक्ष, संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातून त्यांच्या मनात त्यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करतोय, अशी भावना त्यांची झाली असेल. त्यातूनच त्यांनी कार्यकर्त्यांवर भडकले असतील. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूकीत पक्षाला मतदान केले म्हणून त्यांचा ऊस वेळेवर नेला जात नाही. यासंदर्भात जिल्ह्यातून कार्यकर्ते माझ्याकडे येऊन त्यांच्या तक्रारी घेऊन येतात. त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. त्यानुसार मी त्यांना मदत करतो. त्यामुळे मी शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान देतो, असे नाही. वैयक्तिक माझा त्यांना विरोध नाही. उद्या ते राष्ट्रवादीत आले तरी मी त्यांचे स्वागतच करीन. पण आजच्या घडीला मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी जे आव्हान आहे ते माझी स्वीकारण्याची तयारी आहे. 

यापुढे तुमची भूमिका काय राहणार, याविषयी शशिकांत शिंदे महणाले, माझी भूमिका पक्षासाठी काम करत राहणे हीच आहे, तसेच मला पक्षाकडून सातारा- जावळीतून उभे राहावे, अशी सूचना करण्यात आलेली आहे. तसेच कोरेगावातून मी दहा वर्षे आमदार झालो होतो, तेथील लोकांशी मी बांधिल आहे. या सर्व परिस्थितीत कुठेतरी माझ्या मनात भावना असेलच ना, मी माणुसकी जपणारा आणि उपकार जाणारा साधा कार्यकर्ता आहे.

उद्या ते राष्ट्रवादीच्या माध्यमातून पक्षात आले तर मी त्यांचे पहिले स्वागत करेन. पण ते भाजपमध्येच असतील तर जावळी, साताऱ्यात पक्ष संघटना वाढीसाठी मला काम करावेच लागेल. माझा व त्यांचा कोणताही वैयक्तिक वाद नाही, पण पक्ष स्तरावर त्यांचा आणि माझा वाद होऊ शकतो, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com