आमदारांच्या मागणीवरून वन विभागाने दिले बिबट्याला ठार मारण्याचे आदेश - At the request of the MLAs, the Forest Department issued an order to kill the leopard | Politics Marathi News - Sarkarnama

आमदारांच्या मागणीवरून वन विभागाने दिले बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 डिसेंबर 2020

करमाळयाचे आमदार संजय शिंदे यांनी बिबट्याला  ठार मारण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने करमाळा तालुक्यात बिबट्या आढळून आल्यास प्रथम त्याला बेशुध्द करून जेर बंद करावे. त्यानंतर ही तो सापडत नसेल तर त्याला पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्यानी ठार करावे, असा आदेश वन विभागाचे वन्यजीव रक्षक नितीन काकोडकर यांनी दिला आहे.

सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालून दोघांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वन विभागाने दिले आहेत. आठ दिवसांपासून करमाळा तालुक्यात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सुरवातीला प्राण्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याने माणसांवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात एकाच महिन्यात करमाळा तालुक्यातील दोघांचा बळी गेला आहे. यामध्ये लिंबेवाडी येथील शेतकरी कल्याण फुंदे हे रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यास गेले असता त्यांच्यावर बिबटयाने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यु झाला.

त्यानंतर पुन्हा दोन दिवसापूर्वी अंजनडोह येथील महिला शेतकरी जयश्री शिंदे शेतात काम करत असताना त्यांच्यावर ही बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शीर धडावेगळे करून बिबट्याने धड पळवून नेले आहे. या घटनेनंतर सोलापूर जिल्ह्यात बिबटयाची दहशत आणखी वाढली आहे.सोलापूर व बीड जिल्ह्यातील 10 जणांचा बिबट्याने बळी घेतला आहे. 

याघटनेनंतर करमाळयाचे आमदार संजय शिंदे यांनी बिबट्याला  ठार मारण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने करमाळा तालुक्यात बिबट्या आढळून आल्यास प्रथम त्याला बेशुध्द करून जेर बंद करावे. त्यानंतर ही तो सापडत नसेल तर त्याला पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्यानी ठार करावे, असा आदेश वन विभागाचे वन्यजीव रक्षक नितीन काकोडकर यांनी दिला आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख