काँग्रेसच्या राज्यस्तरीय निवडणुक समितीवर रणजितसिंह देशमुख यांची निवड  - Ranjitsingh Deshmukh elected to the Congress state level election committee | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या राज्यस्तरीय निवडणुक समितीवर रणजितसिंह देशमुख यांची निवड 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

प्रदेश पातळीवरील या समितीसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. खटाव- माणचे नेते रणजितसिंह देशमुख काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये परत आले आहेत. त्यांना या समितीच्या माध्यमातून राज्य पातळीवर काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे

मुंबई :  राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनाकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या सदस्यपदी काँग्रेस पक्षात काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या खटाव-माणचे नेते रणजितसिंह देशमुख यांना संधी देण्यात आली आहे.

राज्यस्तरीय १३ सदस्य समितीच्या अध्यक्षपदी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. तर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर या आहेत.

या समितीच्या समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. गणेश पाटील आणि सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, प्रकाश मुगदिया, सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रविण देशमुख, प्रदेश चिटणीस नाना गावंडे, रणजितसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश पातळीवरील या समितीसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
खटाव- माणचे नेते रणजितसिंह देशमुख काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये परत आले आहेत. त्यांना या समितीच्या माध्यमातून राज्य पातळीवर काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख