लाचप्रकरणी कऱ्हाडमध्ये आरटीओ कार्यालयातील खासगी एजंट जाळ्यात - Private agent in RTO office in Karad caught in bribery case | Politics Marathi News - Sarkarnama

लाचप्रकरणी कऱ्हाडमध्ये आरटीओ कार्यालयातील खासगी एजंट जाळ्यात

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

कऱ्हाड आरटीओ कार्यालयात पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने खासगी एजंट हादरले आहेत. उपअधीक्षक श्री. घाटगे म्हणाले, एका तक्रारदाराने नवीन एक्टिवा फाईव्ह जी मोटरसायकल घेतली होती. ती पासिंग करण्यासाठी कऱ्हाड-विजयनगर येथील खासगी एजंटानी संबंधित तक्रारदारास पाच हजारांची लाच मागितली होती.

कऱ्हाड : नवीन एक्टिवा फाईव्ह जी मोटरसायकल पासिंग करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कऱ्हाड (जि.सातारा) येथील आरटीओ कार्यालयातील एका खासगी एजंटावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन कारवाई केली. राजू जाधव असे संबंधित खासगी एजंटाचे नाव असल्याची माहिती सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली. 

कऱ्हाड आरटीओ कार्यालयात पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने खासगी एजंट हादरले आहेत. उपअधीक्षक श्री. घाटगे म्हणाले, एका तक्रारदाराने नवीन एक्टिवा फाईव्ह जी मोटरसायकल घेतली होती. ती पासिंग करण्यासाठी कऱ्हाड-विजयनगर येथील खासगी एजंटानी संबंधित तक्रारदारास पाच हजारांची लाच मागितली.

त्याची माहिती तक्रारदाराने आम्हाला दिली. त्यानुसार आम्ही सापळा लावला. त्यामध्ये खासगी एजंट जाधव याच्यावर आमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन कारवाई केली. संबंधिताने तक्रारदारांकडे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्यासाठी पाच हजाराची लाच मागणी केली होती.

संबंधित कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अतिरीक्त पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील पथकाने कारवाई केली. यामध्ये पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, हवालदार संजय संकपाळ, संजय कलकूटगी, धनंजय खाडे, राधिका माने, बाळासाहेब पवार यांनी केली. दरम्यान, कऱ्हाडच्या आरटीओ कार्यालयात पहिल्यांदाच लाचलुचपत विभागाने अशी कारवाई केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख