पाटण : व्हॉटस्अप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठविल्याप्रकरणी पाटण नगरपंचायतीचे माजी उपाध्यक्ष, विद्यमान नगरसेवक सचिन कुंभार
यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा नगराध्यक्ष अजय कवडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
नगरसेवक कुंभार यांच्याविरूद्ध महेंद्र चव्हाण यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्याची आठ दिवस उलटसुलट चर्चा सुरू होती. कुंभारने नैतिकता स्विकारून नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्याची माहिती नगराध्यक्ष कवडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुभाषराव पवार यांनी पत्रकाद्वारे दिली.
राष्ट्रवादी पक्षासह नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर अशा कोणत्याच अनुचित प्रकाराची कधीही पाठराखण करत नाहीत व यापुढेही करणार नाहीत. कुंभार यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल आहे. न्यायालयात सुनावणी होऊन यातील सत्य समोर येईल. न्याय देवतेवर विश्वास आहे.
त्यामुळे अशा कोणत्याही अनुचित प्रकाराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कदापिही पाठराखण करणार नाहीत, असे पत्रकात नमूद केले आहे. व्हाटस्अप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठवल्या प्रकरणात नगरसेवक सचिन कुंभारला न्यायालयात हजर केले असता त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
नगरसेवक कुंभारने एका ग्रुपवर अश्लील व्हिडिओ टाकला होता. त्यानुसार महेंद्र चव्हाण यांनी फिर्याद दाखल दिली होती. त्यानुसार कुंभारवर गुन्हा दाखल झाला होता. त्यास आज अटक झाली. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस निरीक्षक नितीन चौखंडे तपास करत आहेत.

