ए. वाय. पाटील आणि भैया माने यांची नावे राज्यपातळीवर असतील...  - The names of A. Y. Patil and Bhaiya Mane will be at the state level Says NCP minister Hasan Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

ए. वाय. पाटील आणि भैया माने यांची नावे राज्यपातळीवर असतील... 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

यावेळेला सर्वच कार्यकर्ते हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करुन या मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकावतील. अरुण लाड यांच्या विजयात कोल्हापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल

कोल्हापूर : क्रांतीसिंह नाना पाटलांच्या ब्रिटिशांविरुद्धच्या पत्री सरकारमध्ये क्रांतीअग्रणी जी. डी. बापू -लाड यांचे योगदान मोठे होते. स्वातंत्र्य चळवळीचा महान वारसा असलेल्या पुणे पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाने क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांतीअग्रणी जी. डी. बापू -लाड यांचे स्वप्न साकार करू या, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

श्री. लाड यांनी कागलमध्ये येऊन मंत्री श्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. श्री मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीत अरुण लाड यांची अपार मेहनत फळाला आणूया. गेल्या तिन्ही निवडणुकात त्यांनी अपार कष्ट, मेहनत घेतली. परंतु यश आले नाही. यावेळेला सर्वच कार्यकर्ते हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करुन या मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकावतील. अरुण लाड यांच्या विजयात कोल्हापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल

श्री. मुश्रीफ म्हणाले, या मतदार संघातून अर्ज भरलेले भैया माने यांनी पदवीधरच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये एक उत्कृष्ट संघटक म्हणून चांगले काम केले आहे. ते हाडाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे जिद्दी सैनिक आहेत. त्यांची आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चर्चा झाली आहे. शरद पवार यांनीही त्यांना तसा निरोप पाठविलेला आहे. त्यांनी माघार घ्यावी, अशी विनंती श्री. मुश्रीफ यांनी केली. राष्ट्रवादी पक्षासाठी ज्यांना थांबावं लागलं अशी, ए. वाय. पाटील आणि प्रताप उर्फ भैय्या माने यांची नावे लवकरच राज्य पातळीवर दिसतील, असेही ते म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख