पाटण तालुक्यात मायालेकांची जाळून घेऊन आत्महत्या 

सचिन व त्याच्या आईचा जळून दुर्देवी अंत झाला. घराला आतून कडी लावली होती. पुठ्ठे मोठ्या प्रमाणात पेटलेही होते. दोघेही ज्या ठिकाणी झोपले होते. तेथेच जळून खाक झाले होते. त्यामुळे ही आत्महत्या असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
Mother and Son died in Patan taluka
Mother and Son died in Patan taluka

ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील मोरेवाडी - कुठरे येथील लोकरीवस्तीत मायलेकांने जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या आत्महत्येच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांचेही मृतदेह जळून खाक झाले होते. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. मात्र ही आत्महत्याच असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

सचिन ज्ञानदेव लोकरे (वय 38) , कमल ज्ञानदेव लोकरे (62) अशी मृतांची नावे आहेत. कुठऱ्याच्या मोरेवाडीतील लोकरी वस्तीची पहाट आज मायलेकांच्या आत्महत्येच्या विदारक प्रसंगाने उजाडली. सचिन व त्याच्या आईचा जळून दुर्देवी अंत झाला. घराला आतून कडी लावली होती. पुठ्ठे मोठ्या प्रमाणात पेटलेही होते. दोघेही ज्या ठिकाणी झोपले होते. तेथेच जळून खाक झाले होते. त्यामुळे ही आत्महत्या असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

सचिन याचा दोन दिवसापूर्वी कोरोनाचा स्वॅब घेतला होता. रात्री त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. स्वॅब घेतल्यापासून सचिन अस्वस्थ होता, असे गावकऱ्यांनी सांगितले. सचिनचे वडील कऱ्हाडच्या कृष्णा हाॅस्पीटलमध्ये उपचारास दाखल आहेत. त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्याचाही ताण होताच. काल सायंकाळी सचिनचा भाऊ कृष्णा हाॅस्पीटलला वडीलांकडे गेला. त्यानंतर रात्री उशिरा मायलेकांसोबत दुर्घटना घडली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचा तपास सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com