मोदी सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण अप्रामाणिक, फसवे अन्‌ दुफळी निर्माण करणारे  - Modi government's policy towards farmers is dishonest, fraudulent and divisive | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण अप्रामाणिक, फसवे अन्‌ दुफळी निर्माण करणारे 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 23 डिसेंबर 2020

देशाला अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि अन्नसुरक्षा प्रदान करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा मी ऋणी आहे. दुर्दैवाने आजच्या शेतकरी दिनादिवशीच राजधानी दिल्लीच्या वेशीवर लाखो शेतकरी उघड्यावर, कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत.

सातारा : जमीन अधिग्रहण कायदा असो की किमान हमीभाव अथवा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट योजना असो मोदी सरकारचे शेतकऱ्यांबाबचे धोरण नेहमीच अप्रामाणिक, फसवे आणि दुफळी निर्माण करणारे राहिले आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 

शेतकरी दिनाच्या दिवशीत राजधानी दिल्लीच्या वेशीवर लाखो शेतकरी उघड्यावर, कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या व्टीटर अकौंटवरून मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, देशाला अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि अन्नसुरक्षा प्रदान करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा मी ऋणी आहे. दुर्दैवाने आजच्या शेतकरी दिनादिवशीच राजधानी दिल्लीच्या वेशीवर लाखो शेतकरी उघड्यावर, कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत.

अगदी सुरुवातीपासूनच मग ते जमीन अधिग्रहण कायदा असो किंवा किमान हमीभाव अथवा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट योजना असो मोदी सरकारचे शेतकऱ्यांबाबतीत धोरण नेहमीच अप्रामाणिक, फसवे आणि दुफळी निर्माण करणारे राहिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख