महाविकास आघाडीतील ऐकीमुळेच माझा विजय : प्रा. जयंत आसगावकर - MLC Asgaonkar meet former Chief Minister Prithviraj Chavan at his residence in Karad. | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीतील ऐकीमुळेच माझा विजय : प्रा. जयंत आसगावकर

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

प्रा. आसगावकर म्हणाले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या ऐकीचा हा विजय आहे. शिक्षक मतदारांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे. त्यांचा विश्वास माझ्या कामातून आगामी काळात सार्थ ठरविणार आहे.

कऱ्हाड : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या ऐकीमुळेच माझा विजय झाला आहे. शिक्षकांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे. त्यांचा विश्वास कामातून आगामी काळात सार्थ ठरविणार आहे, असे आश्वासन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिले आहे. 

आमदार प्रा. आसगावकर यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कऱ्हाडातील निवासस्थानी भेट घेतली. कै. प्रेमलाताई चव्हाण, कै. दाजीसाहेब चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सत्वशिला चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, तानाजी चौरे, मलकापूर शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र यादव, आदी उपस्थित होते.

आमदार प्रा. आसगावकर म्हणाले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या ऐकीचा हा विजय आहे. शिक्षक मतदारांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे. त्यांचा विश्वास माझ्या कामातून आगामी काळात सार्थ ठरविणार आहे. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख