मंत्र्यांनी घरूनच विठूरायाची पूजा करावी : अक्षय महाराज - Ministers should worship Vithuraya from home: Akshay Maharaj | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

मंत्र्यांनी घरूनच विठूरायाची पूजा करावी : अक्षय महाराज

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

सध्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या बाबतीत राज्यभर प्रत्येक राजकीय पक्षांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांना शेकडो कार्यकर्ते उपस्थित असतात. तेव्हा शासन या बैठकांवर अंकुश कसा ठेवत नाही? त्यांना नियम का लागू होत नाहीत. वारी व आध्यात्मिक मध्ये काही आले की लगेच नियम लागू होतात. असली दुटप्पी भावना सरकारने ठेऊ नये. 

दहिवडी : अतिशय निष्ठेने परंपरा व नियम सांभाळणाऱ्या वारकऱ्यांना आदराने पंढरपुरात येऊ द्यावे. अन्यथा, जसे वारकऱ्यांना घरी थांबण्यासाठी सांगत आहात, तसेच मंत्र्यांनीसुद्धा घरूनच विठूरायाची पूजा करावी, अशी मागणी वारकरी संप्रदाय युवा मंचचे राज्याध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केली आहे. 

पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी होऊ नये, म्हणून 22 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची परिस्थिती अद्याप कायम असल्याने हा निर्णय घेतला आहे. मात्र, कार्तिक एकादशी दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अक्षय महाराज बोलत होते.

 अक्षय महाराज म्हणाले, "वारकरी संप्रदाय कायमच सरकारी यंत्रणेला सहकार्य करत आला आहे. मात्र, सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने पाहात नाही. शासनाने कार्तिक एकादशीसाठी प्रत्येक मठात किमान 30 ते 50 वारकऱ्यांना सर्व कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घेत परवानगी द्यावी. सध्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या बाबतीत राज्यभर प्रत्येक राजकीय पक्षांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांना शेकडो कार्यकर्ते उपस्थित असतात.

तेव्हा शासन या बैठकांवर अंकुश कसा ठेवत नाही? त्यांना नियम का लागू होत नाहीत. वारी व आध्यात्मिक मध्ये काही आले की लगेच नियम लागू होतात. असली दुटप्पी भावना सरकारने ठेऊ नये. वारकरी संप्रदाय कायम सहकार्य करत आला आहे अन्‌ पुढेही करेल.''  संत श्री गाडगेबाबा कधीच मंत्रालयाची पायरी चढले नव्हते. मंत्री त्यांच्या भेटीस मंत्रालयाबाहेर येऊन थांबत असायचे. एके काळी इतका आदर सरकार बाळगत होते. आता, मात्र सर्वच राजकीय पक्ष किंवा मायबाप सरकार प्रत्येक आध्यात्मिक गोष्टींकडे कानाडोळा करत आहे, असे त्यांनी सांगितले. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख