पाटण मतदारसंघातून शंभूराज देसाईंनी केली ७१ हजार शिवसेना सदस्यांची नोंदणी - Minister Shambhuraj Desai registered 71,000 Shivsena members from Patan constituency | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पाटण मतदारसंघातून शंभूराज देसाईंनी केली ७१ हजार शिवसेना सदस्यांची नोंदणी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

शिवसेना पक्षाने राबविलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेत मंत्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाटण विधानसभा मतदारसंघात एक लाख सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प केला होता. सातारा जिल्हयासाठी तीन लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यातील एक लाख सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात करण्याचे उद्दीष्ट होते.

सातारा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण मतदार संघातील शिवसेना सदस्यांची नोंदणी केलेले ७१ हजार अर्ज जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांचेकडे सुपुर्द केले. मंत्री देसाई यांनी एक लाख शिवसेना सदस्य नोंदणीचा संकल्प केला होता. 
 
शिवसेना पक्षाने राबविलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेत मंत्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाटण विधानसभा मतदारसंघात एक लाख सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प केला होता. सातारा जिल्हयासाठी तीन लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यातील एक लाख सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात करण्याचे उद्दीष्ट होते.

त्यानुसार आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्‍मृतिदिन व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाटण मतदारसंघातील शिवसेना सदस्यांची नोंदणी केलेले ७१ हजार अर्ज शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेळ कमी मिळाल्याने उर्वरीत २९ हजार सदस्यांचे नोंदणी अर्ज महिन्याभरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख