सत्ताधाऱ्यांनो सत्तेचा माज नको; समाज चपलाखालीही घेतो : नरेंद्र पाटलांचा इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधा-यांनी काय केले आहे हे आपण सर्वजण पाहतच आहात.खरं तर राजकीय झूल बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
Maratha leaders in Maharashtra should put aside their political clout and come together for the Maratha community says Narendra patil
Maratha leaders in Maharashtra should put aside their political clout and come together for the Maratha community says Narendra patil

सातारा : सत्ताधा-यांनो सत्तेचा माज करु नका मराठा समाज अथवा कोणताही समाज जेवढं तुम्हांला डोक्यावर घेऊन नाचतो. तेवढंच चपलाखाली घेऊन तुडवतो. त्यामुळे राजकारण्याच्या पलीकडे समाज आणि जात असल्याचे विसरु नका. महाराष्ट्रातील मराठा नेत्यांनी राजकीय झूल बाजूला ठेऊन मराठा समाजासाठी एकत्र यावे असे आवाहन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले.

साताऱ्यात अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे उद्‌घाटन आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप खोंड, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना बरोबर घेऊन राज्य कारभार चालविला. त्यांच्या प्रेरणेनेच मी सातारा येथे हे फाऊंडेशनचे काम करण्यास प्रारंभ करीत आहे. उदयनराजे, 
शिवेंद्रसिंहराजे तसेच संभाजीराजे या तिन्ही राजेंनी एकत्र यावे असे मराठा समाजाला कायम वाटत असते. माझी देखील हीच तळमऴ आहे. यासाठीच मराठ्यांच्या राजधानीत तिघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार उदयनराजेंनी 
मराठा समाजासोबत असल्याचे वेळोवेळी ठणकावून सांगितले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि खासदार संभाजीराजे हे देखील समाजासाठी झटत आहेत. 

माझे वडील अण्णासाहेब हे केवळ  माथाडी कामगारांचे नेते नव्हते तर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. 1980 मध्ये  त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली. आर्थिक निकषावर आरक्षणासाठी 22 मार्च 1982 रोजी त्यांनी भव्य मोर्चा काढला होता. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही, असे त्यावेळी ठणकावून  सांगणाऱ्या अण्णासाहेबांनी दुसऱ्या दिवशी पहाटे स्वतःचे जीवन संपवले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधा-यांनी काय केले आहे हे आपण सर्वजण पाहतच आहात. खरं तर राजकीय झूल बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com