शरद पवारांच्या विचारानेच महाविकास आघाडीची स्थापना : बाळासाहेब पाटील - Mahavikas Aghadi established with Sharad Pawar's thoughts says NCP Minister Balasaheb patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

शरद पवारांच्या विचारानेच महाविकास आघाडीची स्थापना : बाळासाहेब पाटील

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 डिसेंबर 2020

मंत्री पाटील म्हणाले, "कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने राज्याचा महसूल कमी झाला. त्याचा परिणाम विकास कामांवर झाला. महाविकास आघाडीने महात्मा फुले कर्जमाफी योजना त्वरीत लागू केल्याने शेतकरी कर्जमुक्त झाला.

उंब्रज : जनसामान्यांचा विकास हा महाविकास आघाडीचा विचार आहे. पवार साहेबांच्या विचारानेच महाविकास आघाडीचे शासन स्थापन झाले. मात्र, कोरोना काळात फक्त राजकारणासाठी विरोधी भूमिका घेण्याचे काम विरोधकांनी केले असल्याचे मत सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. 

पाल (ता. कऱ्हाड) येथील विविध विकासकामांचे उद्‌घाटन व कोव्हिड योद्धयांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, "कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने राज्याचा महसूल कमी झाला. त्याचा परिणाम विकास कामांवर झाला. महाविकास आघाडीने महात्मा फुले कर्जमाफी योजना त्वरीत लागू केल्याने शेतकरी कर्जमुक्त झाला. सहकारमंत्री झाल्यानंतर पहिल्या विकास सेवा सोसायटीच्या इमारतीचे उद्‌घाटन केले आहे.'' 

ऋतुराज पाटील म्हणाले, "कमी वयात आमदार होता आले. समाजकारण, राजकारण करण्याची संधी लाभली असून, महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची संधी मिळाली आहे. राज्याचे भविष्य घडविण्याची ताकद महाविकास आघाडीत आहे.'' श्रीनिवास पाटील म्हणाले, "खालून वर मारण्यापेक्षा खालून वर उचलण्याची पद्धत पाहिजे. या शिवाय कुठलेही काम करताना चातुर्याने करायची कला पाहिजे. जात, पात, लिंग भेद न ठेवता एकत्र राहिले तर नक्कीच प्रगती होते.'' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख