सातारा : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून सकाळी दहा पर्यंत पदवीधरसाठी पाच जिल्ह्यातून एकुण ८.५२ टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी ११.३८ टक्के मतदान झाले होते.
सर्वच बुथवर महाविकास आघाडी तसेच भाजपचे नेते व कार्यकर्ते ठाण मांडून बसलेले आहेत. मतदाना धिम्या गतीनेच सुरू आहे. पुणे जिल्ह्यात सात, सातारा ७.२१, सांगली ८.९८, सोलापूर ७.६९, कोल्हापूर ११.७५ टक्के मतदान झाले होते. पाच जिल्ह्यातून एकुण ८.५२ टक्के मतदान झाले असून पुरूष मतदारांचे मतदानाची टक्केवारी ९.५१ तर स्त्रीयांची ६.३८ टक्के मतदान झाले आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी पाच जिल्ह्यातून ११.३८ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातून ८.१०, सातारा १०.६५, सांगली १३.४९, सोलापूर १२.२३, कोल्हापूर १८.२२ टक्के मतदान झाले आहे. पुरूष मतदारांची टक्केवारी १४.१९ तर स्त्री मतदारांची टक्केवारी ६.७३ टक्के आहे. मतदानात दोन्ही मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. तर सर्वात कमी मतदान पुणे जिल्ह्यातून झाले आहे. पुण्यात पदवीधरसाठी सात, शिक्षकसाठी ८.१० टक्केच मतदान झाले आहे.

