अजित पवारांची खेळी; अन्‌ जितेंद्र पवारांचा पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश - Jitendra Pawar rejoins NCP | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांची खेळी; अन्‌ जितेंद्र पवारांचा पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज असलेल्या जितेंद्र पवार यांना भाजपने पक्षात घेतले. जानेवारी 2020 मध्ये हरणाई सुत गिरणीवर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खटाव तालुक्‍यात चर्चा सुरू होती.

कऱ्हाड : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकिट दिले नाही म्हणून नाराज होऊन जितेंद्र पवार भाजपमध्ये गेले होते. हरणाई सुत गिरणीवर कार्यक्रमासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर श्री. पवार यांनी पुन्हा स्वगृही येण्याचा निर्णय घेतला होता. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत जितेंद्र पवार यांनी आपल्या समर्थकांसह पुन्हा हातात घड्याळ बांधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे खटाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. 
 
 जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार यांनी 2017 मध्ये खटाव तालुक्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून तसेच पंचायत समितीचे तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन बंडखोरीचे निशाण हाती घेतले. अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी अपक्ष उमेदवारी करून तब्बल सहा हजार मते मिळवली होती.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज असलेल्या जितेंद्र पवार यांना भाजपने पक्षात घेतले. जानेवारी 2020 मध्ये हरणाई सुत गिरणीवर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खटाव तालुक्‍यात चर्चा सुरू होती. सहकार व पणन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही मतदारसंघ मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे.

मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत श्री. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ज्योतिराम थोरात, भाऊसाहेब लादे, शिवाजी शिंदे, महादेव माने, पांडुरंग माने, श्रीमंत कदम, साधू मगर, बजरंग पवार, बापूराव माने, निवास पवार, धोंडीराम जगताप, मदने गुरुजी, दादासाहेब कदम, धनाजी पाटील, दिलीप यादव, दिनकर पाटील, सुदाम पिसाळ, दाऊद पटेल, तुषार माने, सचिन माने, अविनाश घार्गे, विजय पिसाळ, दादासाहेब दगडे, प्रताप शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख