कोरोना काळात सातारच्या जनतेला पालकमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले : विक्रम पावसकर यांचा आरोप - The Guardian Minister of Satara has left the people in the lurch in the Corona epidemic. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

कोरोना काळात सातारच्या जनतेला पालकमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले : विक्रम पावसकर यांचा आरोप

संतोष चव्हाण
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

आगामी काळामध्ये सर्व निवडणूका भाजप पूर्ण ताकदीने स्वबळावर लढविणार आहे. निवडणुकांना सामोरे जात असतानाच सर्व ठिकाणचे स्थानिक प्रश्नावर काम करणार आहोत.

उंब्रज : कोरोना काळात साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषेदत केला. कऱ्हाड उत्तरेतील स्थानिक स्वराज्य संस्थांसह गावपातळीवरील निवडणुका भाजप स्वबळावर पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे, असेही श्री. पावसकर यांना स्पष्ट केले. 

श्री. पावसकर म्हणाले, साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी कोरोना महामारीमध्ये जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. जनतेला गरज नव्हती तेंव्हा कोविड सेंटरची उभारणी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण या प्रश्नात महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे.

अतिवृष्टी, प्रवासी मजूर, निसर्ग चक्रीवादळ, कोरोनाबाधित छोटे मोठे व्यापारी, व्यावसायिक, पालघर हत्याकांड, प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्यावर व्देषभावनेने कारवाई यासर्व प्रकारामुळे राज्य सरकार बदनाम झाले आहे. आगामी काळामध्ये सर्व निवडणूका भाजप पूर्ण ताकदीने स्वबळावर लढविणार आहे. निवडणुकांना सामोरे जात असतानाच सर्व ठिकाणचे स्थानिक प्रश्नावर काम करणार आहोत.

उंब्रजला 21 कोटी रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजना आराखडा तयार झाला आहे. प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी अद्याप बाकी आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्याचे प्रशांत देशमुख यांनी सांगितली. यावेळी तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव, महेंद्रकुमार डुबल, सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, रामकृष्ण वेताळ, ॲड.विशाल शेजवळ, प्रशांत देशमुख उपस्थित होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख