महाविकासचा फॉर्मूला ग्रामपंचायत निवडणुकीत दिसणार नाही  - Gram Panchayat elections will not show the formula of Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकासचा फॉर्मूला ग्रामपंचायत निवडणुकीत दिसणार नाही 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

जयंत पाटील म्हणाले, मुळात ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष चिन्हावर, एबी फॉर्मवर निवडणुक लढवित नाहीत. प्रत्येक गावातील वेगवेगळे प्रश्न घेऊन गट उभे राहात असतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांत पक्षाच्या राजकारणाव्यतिरिक्त गावातील स्थानिक राजकारणावर निवडणुक चालत असते.

सातारा : ग्रामपंचायतीच्या निवडणुका या कोणत्याही पक्ष चिन्हावर, एबी फॉर्मवर लढविली जात नाहीत. प्रत्येक गावातील वेगवेगळे प्रश्न घेऊन गट उभे राहतात, त्यामुळे या निवडणुकीत गावातील स्थानिक राजकारणावर निवडणुका चालत असल्याने महाविकासचा फॉर्मूला असणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज अल्पवेळ येथील शासकिय विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे का, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, मुळात ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष चिन्हावर, एबी फॉर्मवर निवडणुक लढवित नाहीत. प्रत्येक गावातील वेगवेगळे प्रश्न घेऊन गट उभे राहात असतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांत पक्षाच्या राजकारणाव्यतिरिक्त गावातील स्थानिक राजकारणावर निवडणुक चालत असते.

शिक्षक, पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्या अपयशाबाबत विचारले असता श्री. पाटील म्हणाले, विधानसभेची ही निवडणुक एकत्र लढून महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये काही ठिकाणी यश मिळाले तर काही ठिकाणी अपयश मिळाले. कुणाला काय मिळाले ही परिस्थिती त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवर अवलंबुन असते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झाल असेल तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख